चिंचाळा येथे विद्युत तारेला चिटकून बैल ठार

Beed

चिंचाळा येथे विद्युत तारेला चिटकून बैल ठार

आष्टी। प्रतिनिधी
बीड प्रसार न्युज

आष्टी तालुक्यातील चिंचाळा येथील लमाणतळ वस्ती येथे राहणारे शेतकरी सुनील अंगद पोकळे यांच्या  उसाच्या शेतामध्ये सुनील पोकळे व मोहन पोकळे हे दि. २०.०८.२० रोजी दुपारी ४ च्या सुमारास पाळी घालत असतांना विद्युत पुरवठा करणारी थ्री फेजची तार खांबावरून कधी तुडुन पडलेले होती. ती माहिती नसल्याने पाळी घालत असतांना बैलांचा पाय या विजवाहक तारेवर पडल्याने बैल जागीच ठार झाला. औत हे लोखंडी होते तर लाकडाचे जु असल्यामुळे दुसरा बैल व या दोन शेतकरी यांचा जिव वाचला.  यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. शेतकरी सुनील पोकळे व महादेव पोकळे यांनी ही बाब लक्षात येताच अति चतुराईने दुसरा बैल व स्व:ताचे प्राण वाचवले. तुटलेल्या विजवाहक तारेत विज प्रवाह उतरल्याने विजेचा धक्का बसुन बैल जागीच ठार झाला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे ६५ हजारांचे नुकसान झाले आहे. आष्टी पोलीस यांनी या घटनेचा पंचनामा करून  पशुसंवर्धन अधिकारी आष्टी यांनी शवविच्छेदन केले असता विजेच्या धक्क्याने सदर बैलांचा मुत्यु झाल्याचे स्पष्ट झाले. एम.एस.ई.बी चा भोंगळ कारभार यातुन दिसत आहे.चाळीस वर्षांपूर्वीच्या या विजेच्या तारा पार खाली लोंबकळत असून डोक्याला लागत आहेत पुन्हा जिवित हानी होऊ शकते.

Sharing

Visitor Counter