भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या अधिकाऱ्यावर समाजकल्याणची धुरा...!

Beed

भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या अधिकाऱ्यावर समाजकल्याणची धुरा...!

बीड/वार्ताहर

बीड जिल्ह्यातील अनुसूचित जाती व इतर मागासवर्गीय समाजातील गोरगरीब वंचित बहुजनांची शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागावर आहे. जिल्हास्तरीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमध्ये अध्यक्ष, उपायुक्त ही वर्ग-1 ची दोन्ही पदे रिक्त आहेत, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण बीड कार्यालयात सहायक आयुक्त समाज कल्याण वर्ग-1 हे पद 2016 पासून रिक्त आहे. समाजकल्याण अधिकारी गट ब व विशेष अधिकारी, शासकीय निवासी शाळा गट-ब 2 ची पदे 2016 -17 पासून रिक्त आहेत जिल्हा परिषद समाज कल्याण बीडमध्ये जिल्हा समाजकल्याण अधिकारी वर्ग 1 हे पद देखील रिक्त आहे संपूर्ण समाजकल्याण विभागात भ्रष्टाचाराचे आरोप असणारे व वादग्रस्त श्री मडावी हे एकमेव अधिकारी असून त्यांच्याकडे संशोधन अधिकारी, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण अधिकारी असे सर्वच कार्यभार दिलेले आहेत. श्री मडावी यांच्यावर जिल्हा वार्षिक योजनेमधील घोटाळा, घरकुल घोटाळा, जमीन खरेदी प्रकरण असे अनेक आरोप असूनही त्यांच्याकडेच कार्यभार दिल्यामुळे समाजकल्याण विभागाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे. समाज कल्याण मंत्री हे बीड जिल्ह्याचे असून बीड मधील सहा अधिकारी पदे रिक्त आहेत मंत्री महोदय भ्रष्ट मडावी ची हकालपट्टी करून अधिकाऱ्यांची पदे भरतील का असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून होत आहे.

Sharing

Visitor Counter