सर्व प्रकारचे सर्व दुकानांना उघडण्याची परवानगी

सर्व प्रकारचे सर्व दुकानांना उघडण्याची परवानगी
बीड/प्रतिनिधी
राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2,3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली होती परंतु आजच्या आदेशात बीड , माजलगांव , परळी , अंबाजोगाई , केज व आष्टी या शहरांमधिल सुशोभिकरणाचे साहीत्य विक्री करणारे दुकाने , मिठाई दुकाने , हॉटेल , रेस्टॉरंट , व इतर सर्व प्रकारच्या सर्व दुकानांना उघडण्याच्या परवानगी बाबत स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येईल असे आदेशित केले होते . त्याअर्थी , बीड , माजलगांव , परळी , अंबाजोगाई केज व आष्टी या शहरांमधिल सुशोभिकरणाचे साहीत्य विक्री करणारे दुकाने , मिठाई दुकाने , हॉटेल , रेस्टॉरंट यांना व इतर सर्व प्रकारच्या दुकानांना दिनांक 23.08.2020 पासून उघडण्यास परवानगी देण्यात येत आहे . सर्वांनी कोवीड -19 विषयक सर्व खबरदारी पाळूनच कामकाज करावे.कन्टेनमेंट झोन मधील निबंध तसेच कायम राहतील .








