नगरसेवक विकास जोगदंड यांच्या हस्ते घरकुल भुमिपुजन संपन्न

Beed

नगरसेवक विकास जोगदंड यांच्या हस्ते घरकुल भुमिपुजन संपन्न 

बीड/प्रतिनिधी 

 प्रभागातील,शास्त्री नगर, रमाई कॉलनी, वतार वेस, एकता नगर,नागोबा गल्ली पेठ बीड येथील सुमारे चारशे पंचाहत्तर गरजु कुटुंबास रमाई घरकुल आवास योजना, व  प्रधान मंत्री घरकुल योजनेतून घरकुल मंजुर झाले असुन आज प्रत्यक्षात  लाभार्थ्यांच्या घरकुलाच्या बांधकामाचा शुभारंभ या भागाचे दबंग नगरसेवक मा विकासजी जोगदंड यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी लाभार्थ्यांचे घरकुल चे स्वप्न पुर्ण होत असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद झळकत होता या क्षणी  बीड नगरीचे विकासम्राट नगराध्यक्ष डॉ भारतभुषणजी क्षीरसागर व नगरसेवक विकासजी जोगदंड यांचे आभार लाभार्त्यांने मानले असुन समाधान व्यक्त केले आहे
या प्रसंगी मंगेश जोगदंड, रवी जोगदंड, राजेशभाई कोकाटे, बबन जोगदंड, गोरख जोगदंड, जेष्ठ नागरिक विजयभाऊ जोगदंड, सह आदीं उपस्थित होते

Sharing

Visitor Counter