आजपासून मोहल्ला किलीनिक चालु,उपचार फक्त १०रू.मध्ये
Beed

आजपासून मोहल्ला किलीनिक चालु,उपचार फक्त १०रू.मध्ये
बीड/प्रतिनिधी
अल खैर मल्टीपर्पज फाउंडेशन च्या वतीने आज मोमीन पुरा भागातील हुजरा मस्जिद जवळ मोहल्ला क्लीनिक मुफ्ती आरेफ साहेब यांच्या हस्ते दुवा करून आज पासुन क्लिनिक चालु करण्यात आलं आहे.
मोहल्ला क्लीनिक हे अजून तीन जागेवर चालु होणार आहे जसे अजीज पुरा,शहिंशानगर,व बालेपरी या ठिकाणी चालु होणार याचे वैशिष्ट्य म्हणजे दवाखान्यात उपचार घेणार्यां प्रत्येक रूग्णाला फक्त १०रू द्यावे लागणार आहे.
यावेळी उपस्थित सर्व सामाजिक कार्यकर्ते व मोमिनपुरा जिम्मेदार कमिटी तसेच ईमदात ग्रुप आणि अल खैर मल्टीपर्पज फाउंडेशन बीड चे पदाधिकारी आदी उपस्थित होते
ऊपचार कोणते होणार आहे
सर्दी,खोकला,ताप,डोकेदुखी इत्यादी प्रकारचे आजारावर याठिकाणी नागरीकांना उपचार देण्यात येणार आहे.








