नवक्रांती गणेश मंडळाच्या वतीने शुक्रवारी रक्तदान शिबिराचे आयोजन

नवक्रांती गणेश मंडळाच्या वतीने शुक्रवारी रक्तदान शिबिराचे आयोजन
किल्लेधारूर/प्रतिनिधी
किल्लेधारूर येथील प्रसिद्ध नवक्रांती गणेश मंडळाच्या वतीने प्रतिवर्षी प्रमाणे या ही वर्षी रक्तदान दिन २८ ऑगस्ट २०२० (शुक्रवार)रोजी लिंगायत मठ ,क्रांती चौक येथे आयोजित केले रक्तदान शिबिर सतत सहावे वर्षी ही आयोजित करण्यात आले असून या रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे आव्हान नवक्रांती गणेश मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
किल्लेधारूर शहरात मंडळाच्या च्या वतीने गेल्या ७९ वर्षांपासून वेगवेगळे, सामाजिक व पर्यावरण पूरक,व सांस्कृतिक उपक्रम उत्सव च्या काळात मोठ्या प्रमाणात राबविले जातात पण या वर्षी कोरोना रोगा मुळे काही उपक्रम रद्द केले तर काही जे अत्यंत आवश्यक असे समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत त्यातिलाच एक रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे याही वर्षी या रक्तदान दिन किल्लेधारूर येथे लिगायत मठ,क्रांती चौक येथे शासकीय सर्व नियमाचे पालन करून या ठिकाणी या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून सकाळी दहा ते दोन या वेळेमध्ये हे रक्तदान शिबिर संपन्न होणार आहे या रक्तदान शिबिरात दर वर्षी विक्रमी रक्तदान होते. या ही वर्षी कोरोना च्या संकटकाळात रक्ताची गरज सर्वत्र असल्यामुळे जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन नवक्रांती गणेश मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे








