गणेश विसर्जन दिवशी जिल्ह्यात संपूर्ण मद्य विक्री बंद ठेवण्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आदेश

Beed

गणेश विसर्जन दिवशी जिल्ह्यात संपूर्ण मद्य विक्री बंद ठेवण्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आदेश 

बीड/प्रतिनिधी 

बीड दि .25 जिल्ह्यात 22 ऑगस्ट गणेशोत्सव सुरू झाला असून 1 सप्टेंबर  2020 रोजी संपूर्ण बीड जिल्ह्यातील संपूर्ण गणेश विसर्जन होणार असून या कालवधीत जिल्हात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र दारू बंदी कायदा 1949 कलम 142 ( 1 ) कलम अंतर्गत वरील दिनांकास बीड जिल्ह्यात संपूर्ण मद्य विक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दिले आहेत . जिल्ह्यात देशी , विदेशी , सीएल -२ सीएल -३ , एफएल -२ एफ एल -३ परवाना कश , एफ एल , बीआर -२ व ताडी अबकारी अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत . अनुज्ञपती धारकानी या आदेशाचे पालन करावे.संबधित ठिकाणी अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेशाचे उल्लंघन करून मद्य विक्री करत असल्याचे आढळून आल्यास ते धारण करीत असलेल्या अनुज्ञप्ती कायम रद्द करण्यात येईल . तसेच नमूद अधिनियमातील तरतुदी अन्वय संबंधितावर कारवाई करण्यात येईल . त्यासह 3 ऑगस्ट रोजी माजलगाव येथील टेबे गणेश मंडळाचे विसर्जन असल्याने माजलगाव येथे आणि 27 ऑगस्ट रोजी लिंबा गणेश येथील भालचंद्र गणेश मंडळाचे विसर्जन होणार असून या दिनांकास या संबंधित ठिकाणी संपूर्ण मद्य विक्री बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत

Sharing

Visitor Counter