धारूर शहरातील नाथ नगर, आझाद नगर मध्ये चोरट्यांचा धुमाकूळ आरडाओरड करणाऱ्या महिलेच्या डोक्यात कोयत्याने वार

Dharur

धारूर शहरातील नाथ नगर, आझाद नगर मध्ये चोरट्यांचा धुमाकूळ आरडाओरड करणाऱ्या महिलेच्या डोक्यात कोयत्याने वार

किल्ले धारूर/इरफान शेख 

धारूर शहरातील नाथ नगर, आझाद नगर भागात पहाटे ३ वाजता चोरट्यांनी धुमाकूळ घातला यावेळी जागी झालेल्या ५० वर्षीय हुशानबी शाह या महिलेने आरडाओरड करताच चोरट्यांनी महिलेच्या डोक्यात कोयत्याने वार केला महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने ग्रामीण रुग्णालयात प्रथिमक उपचार करून पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात पाठविण्यात आले आहे

आज पहाटे शहरातील नाथ नगर भागातील नवाब शाह यांच्या घरी ४ वाजता चोरट्यांनी कपडे अस्तव्यस्त करत घरातील 1900 रुपये व काही समान घेवून गेले तसेच आझाद नगर भागतील शारुख पठाण मिस्त्री  यांच्या घरी पहाटे ४:३० वाजता चोरटे खिडकीतून आत घुसले कपाट तोडून आत मधील सोन्याचे गलसर, बारा हजार रुपये व मोबाईल घेवून पसार झाले शहरात दररोज चोरीच्या घटना घडत आहेत यामुळे नागरिक मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे कालच चिंचपुर रोडवरील गीताज्ञान आश्रमात चोरी झाली होती तिचा तपास लागतो न लागतो तोच आणखी एक घटना घडल्याने पोलीस प्रशासन समोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे पोलीस निरीक्षक सुरेखा धस, पालवे, भालेराव यांनी घटना स्थळी भेट देवून तपास प्रक्रिया सुरू केली आहे

Sharing