नगर पालिकेच्या हलगर्जी पणामुळे नागरीकांचे जिव धोक्यात !

Beed

नगर पालिकेच्या हलगर्जी नागरीकांचे जिव धोक्यात!

बीड प्रतिनिधी

बीड शहरात शिवाजी चौकापासुन ते बार्शी नाका चौका पर्यंतच्या हायवे रोडवर मोकाट जनावरांचा सुळसुळाट दिसत आहे मात्र नगरपालिकेच्या कर्मचार्यंच्या लक्षात येत नाही नगर पालिकेला सतत निदर्शनास आणून देखील पण नगरपालिकेने याची व्यवस्था  केलेली नाही.

नगरपालिकेच्या या  हलगर्जीपणामुळे एखाद्याचा जिव जाऊ शकतो कारण शहरातील फिरणार्या मोटरसायकल स्वार ज्यास्त  असतात आणि एखाद्या भरधाव वेगाने जात असलेल्या मोटरसायकल समोर एखादा जानवर आडवा आलं तर मोठा अपघात होण्याची शक्यता देखील आहे.जर अपघातात एखाद्याचा जिव गेला तर याचा जिम्मेदार कोण असेल? असा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित होत आहे.नगर पालिकेच्या कर्मचार्याने त्वरित या मोकाट जनावरांची व्यवस्था करावी आशी मागनी नागरीकांकडुन होत आहे.

Sharing

Visitor Counter