माजलगावात ग्रामसेवकांकडून मजूर नोंदणीसाठी मजुरांची हेळसांड

माजलगावात ग्रामसेवकांकडून मजूर नोंदणीसाठी मजुरांची हेळसांड
गटविकास अधिकारी यांना घेरावा घालून राडा आंदोलन करण्याचा संघर्ष मजुर क्रांती संघटनेचा ईशारा
माजलगाव/प्रतिनिधी
राज्य शासनाने बांधकाम कामगार मजूराची नोंदनी जलद गतीने हावी म्हणुन विविध पातळीवर प्रयत्न करित आहे.मात्र माजलगाव तालुक्यातील ग्रामसेवकांकडून मजूर नोंदणीसाठी ९० दिवसाचे प्रमाणपत्र देण्यासाठी मजुरांची अडवूनक करत हेळसांड करीत असल्याच निषेधार्थ संघर्ष मजुर क्रांती संघटनेच्या वतिने दि ०४ सप्टेंबर रोजी गटविकास अधिकारी यांना घेराव घालुन राडा आंदोलन करण्याचा इशारा शेख सादेक यांनी दि २७ आँगस्ट रोजी गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाव्दारे दिला आहे.
संघर्ष मजुर क्रांती संघटनेच्या वतीने गटविकास आधिकारी यांना दिलेल्या निवेदनात असे नमुद करण्यात आले आहे कि शासनाने असंघटीत बांधकाम कामगारांची मजुर नोंदणी जलदगतीने होण्यासाठी विविध परीने प्रयत्न करत असुन त्यासाठी शासनाने बांधकाम कामगारांची मजुर नोंदणीसाठी ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र संबधित ग्रा.पं.च्या ग्रामसेवकांनी देण्याचे स्पष्ट आदेश शासनाच्या जि.प.च्या मुख्यकार्यकारी आधिकारी यांनी दि ६ जानेवारी २०२० रोजी दिले आहेत ,त्या अनुषंगाने गटविकास अधिकारी यांनी त्यांच्या स्तरावरुन माजलगाव तालुक्यातील ग्रा.पं.च्या ग्रामसेवकांना दि १५ जुलै २०२० / पंचायत समिती आ.क्र.१२६/ प्रमाणे आदेश काढुन बांधकाम मजुरांना ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र विनाअट देण्यात यावे आसे आदेशित करुन सुध्दा काही गावचे ग्रामसेवक स्वत:चा मनमानी कारभार राबवुन गटविकास अधिकारी यांनी दिलेल्या आदेशाची पायमल्ली करीत आहेत ज्यामध्ये पात्रुड,राजेगाव, एकदरा, रोषणपुरी,हिवरा व टाकरवण येथील ग्रामसेवक हे मजुरांना ९० दिवसाचे बांधकाम प्रमाणपत्र देण्यासाठी विविध अटी घालुन, स्वघोषणा प्रमाणपत्र १०० रुपये बॉन्डवर शपथपत्र करुन घेणे असे कारणे सांगुन मजुरांना ९० दिवसाचे प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करीत आहेत तर,शासनाच्या परिपत्रकामध्ये बांधकाम मजुरांना ९० दिवसाचे प्रमाणपत्र देण्यासाठी स्वघोषणापत्र १०० रु.बॉन्डवर शपथपत्र घेण्याबाबत कोणतेही अट नसतांना संबधित गावचे ग्रामसेवक शासनाच्या आदेशाला डावलुन बांधकाम कामगार मजुरांनकडुन १०० रु.च्या बॉन्डवर नोटरी स्वघोषणापत्र हमीपत्र घेणे शासन परिपत्रकाच्या विरोधात आहे.अशा कोविड १९ च्या मोठ्या संकटात मजुर असतानी सुध्दा यांच्यावर मोठ्या अत्याचार होत आहे . त्यामुळे बांधकाम कामगार मजुर नोंदणीसाठी ग्रा.पं.चे ९० दिवसाचे प्रमाणपत्र विनाअट देण्याबाबत गटविकास अधिकारी यांनी त्यांच्या स्तरावरुन संबधित गावच्या ग्रामसेवकास दि ०२ सप्टेंबर रोजी पर्यंत समज देवुन त्यासाठी वेगळे आदेश काढण्यात यावे नसता या प्रश्नी दि.०४ सप्टेंबर २०२० रोजी संघर्ष मजुर क्रांती संघटनेच्या कामगार महिला व पुरुष्यांच्या वतिने घेराव घालुन राडा अंदोलन करण्याचा इशारा संघर्ष मजुर क्रांती संघटनेचे संस्थापक आध्यक्ष शेख सादेक, सचिव राजु कुरेशी यांनी गटविकास अधिकारी यांना दि २७ आँगस्ट रोजी दिलेल्या निवेदनाव्दारे दिला आहे.








