नवक्रांती गणेश मंडळाचे रक्तदान शिबीरात ५३ रक्तदात्याचे रक्तदान

नवक्रांती गणेश मंडळाचे रक्तदान शिबीरात ५३ रक्तदात्याचे रक्तदान
किल्लेधारूर/प्रतिनिधि
किल्लेधारूर शहरातील नवक्रांती गणेश मंडळाचे वतीने आयोजीत रक्तदान शिबीरात ५३ रक्तदात्यानी रक्तदान केले. गणेश उत्सव निमीत्त हा उपक्रम राबवण्यात आला या चे उदघाटन माजी आरोग्य मुख्यमंत्री सहाय्यता कक्षप्रमुख ओमप्रकाश शेटे यांचे हस्ते करण्यात आले .त्यांनी या उपक्रमाचे कौतूक केले या उत्सवातून अशी सामाजीक बांधीलकी जोपासाल्या गेली पाहीजे असे हि प्रतीपादन केले.
नवक्रांती गणेश मंडळाचे हे वर्ष ७९ वे वर्ष असून विवीध सामाजीक उपक्रमा राबवून हे गणेश मंडळ हा उत्सव साजरा करते या वर्षी गणेश उत्सव कोरोनाच्या संकटम काळात आल्याने सामाजीक बांधीलकी सोपण्याचे काम करण्या साठी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते या शिबीराचे उद्दघाटन माजी आरोग्य मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता कक्षप्रमुख ओमप्रकाश शेटे यांचे हस्ते करण्यात आले या शिबीरात कोरोना च्या अनुषंगाने शासकीय सर्व नियमाचे पालन करत ५३ रक्तदात्यांनी रक्तदान केले, युवकांनी मोठया प्रमाणात सहभाग होता या शिबीराचे उदघाटन प्रसंगी कादेवाडी सरपंच कांदे,बंडू खांडेकर, लोकमत तालुका प्रतिनिधी अनिल महाजन, जलदुत विजय शिनगारे,जेष्ठ नागरिक प्रमोदकुमार तिवारी हे उपस्थीत होते यावेळी पञकार अनिल महाजन यांनी मार्गदर्शन केले .डॉ केदार कुटे, शशिकांत पारखे,जगदीश रामदासी रक्तपिडी तर्फे काम पाहिले या कार्यक्रमाचे सुञसंचलन दिनेश कापसे प्रास्ताविक ज्ञानेश्वर शिंदे आभार अमरजीत तिवारी यांनी मानले
यावेळी मंडळाचे पदाधिकारी,नागरिक उपस्थित होते.हे शिबीर यशस्वी करण्यासाठी शिवा शेटे,प्रदीप कोमटवार,यश शुक्ला,संस्कार व्यवहारे,पवन कापसे,तन्मय मुंडे, प्रसाद शेटे,वरद शेटे,श्रीनिवास शिंदे,मंडळाचे सर्व कार्यकर्त्यानी परीश्रम घेतले








