जय किसान गणेश मंडळाच्या वतीने एक घर एक झाड योजना राबविण्यात आली

Beed

जय किसान गणेश मंडळाच्या वतीने एक घर एक झाड योजना राबविण्यात आली

मंडळाच्या 56 व्या वर्ष्याचे औचित्य साधून 560 झाडांचे वाटप

किल्ले धारूर/प्रतिनिधी
        
येथील जय किसान गणेश मंडळ नेहमी काही ना काही वेगळे करून चर्चेत असते या ही वर्षी असाच वेगळा उपक्रम राबविण्यात आला मंडळाच्या 56 व्या वर्षाचे औचित्य साधून तब्बल 560 झाडांचे घरो घरी जाऊन वाटप करण्यात आले.
         किल्ले धारूर शहरातील जय किसान गणेश मंडळ सतत काही तरी वेगळे करून चर्चेत असते या ही वर्षी मंडळाच्या वतीने आत्तापर्यंत पशुधन आरोग्य शिबीर,या शिबिरात 1018 पशुधना उपचार करण्यात आले,ऑनलाइन वकृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा घेण्यात आली व उध्या 29 ऑगस्ट शनिवार रोजी रक्तदान शिबीर घेण्यात येणार आहे. तुकाराम महाराजांच्या चारोळी प्रमाणे वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वन चरे या म्हणी प्रमाणे 560  झाडांचे वाटप केले. मंडळाचे 56 वे वर्ष असून याचे औचित्य साधत 560 झाड घरो घरी जाऊन वाटप केले,यात प्रामुख्याने आंजन,आवळा,चिंच,कडू लिंब इत्यादी प्रमाणात झाडांचा समावेश होता. या वेळी मंडळाचे अध्यक्ष अमोल जगताप जेष्ठ नागरिक राजू किरपणे,गणेश गिरी,शुभम निकते,अश्रूबा घोडके,प्रसाद शिनगारे,सुरज तिबोले, डॉ अरविंद लोंढे,बंटी तिबोले,अमोल खामकर, पवन निकते,रमेश जाधव,गणेश पवार,श्रीकांत गव्हाणे,अभिषेक जगताप,मयूर साखरे,आकाश मोरे,वैभव किरुंद,आदित्य सावंत
इत्यादी प्रमाणत मंडळाचे सदस्य उपस्थित होते

Sharing

Visitor Counter