शहरातील पिंपरगव्हाण रोडवरील मुख्य सिमेंट रस्ता कामाचे उदघाटन नगराध्यक्ष भारतभुषण क्षीरसागर यांच्या हस्ते संपन्न
Beed

शहरातील पिंपरगव्हाण रोडवरील मुख्य सिमेंट रस्ता कामाचे उदघाटन नगराध्यक्ष भारतभुषण क्षीरसागर यांच्या हस्ते संपन्न
बीड/प्रतिनिधी
आज शहरातील पिंपरगव्हाण रोडवरील मुख्य सिमेंट रस्ता कामाचे उदघाटन नगराध्यक्ष भारतभुषण क्षीरसागर यांच्या हस्ते संपन्न झाले. या कामास तात्काळ सुरुवात करण्यात आली.गेल्या अनेक वर्षापासूनचा हा प्रश्न मार्गी लागल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला.
यावेळी दिलीप गोरे,नगरसेवक भास्कर जाधव,किशोर पिंगळे,शशिकांत जाधव,सुभाष सपकाळ,नागेश तांबारे, पिंटू माने,संजय वाघमारे,अमोल बागलाने, प्रमोद पुसरेकर, संतोष शेळके, ठाकुर,मुन्ना गायकवाड,राजु बागडे,संदिप नवले व परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.








