जगदंबा गणेश मंडळाच्या वतीने ठेवण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 90 रक्तदात्यांनी केले रक्तदान

जगदंबा गणेश मंडळाच्या वतीने ठेवण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 90 रक्तदात्यांनी केले रक्तदान
टिपू सुलतान युवा मंचचे जिल्हाध्यक्ष शेख अमजत बाबू यांनी रक्तदान करून दिला हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश
गेवराई/प्रतिनिधी
जगदंबा गणेश मंडळाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे घेण्यात येणार्या रक्तदान शिबिरात यावर्षी 90 रक्तदात्यांनी रक्तदान केले तर टिपू सुलतान युवा मंचचे जिल्हाध्यक्ष शेख अमजत यांनीदेखील रक्तदान शिबिरात रक्तदान करून हिंदू-मुस्लीम एकतेचा संदेश दिला
जगदंबा गणेश मंडळाच्या वतीने इतरत्र पैसे खर्च न करताविविध स्तुत्य उपक्रम राबवत असतात त्यामध्ये अन्नदान तसेच रक्तदान शिबिरे घेऊन गणेश उत्सव साजरा करत असतात गणेश मंडळाला या वर्षी 50 वर्षे पूर्ण झाले असून या वर्षी देखील दिनांक 30 ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते या शिबिरामध्ये सोशल डिस्टंसिंग चे नियम पालन करून रक्तदान शिबिर घेण्यात आले शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला90 रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले रक्तदान श्रेष्ठदान हे कर्तव्य बजावले आहे विशेष म्हणजे या रक्तदान शिबिरात हिंदू-मुस्लीम एकतेचा संदेश देखील टिपू सुलतान युवा मंच जिल्हाध्यक्ष जिल्हा अध्यक्ष शेख अमजत बाबु यांनी रक्तदान करून हिंदू-मुस्लीम एकतेचा संदेश दिला आहे








