पँथर दनका बौद्ध विहारावरील तारा काढल्याधम्मपाल कांडेकर यांच्या आंदोलनास यश

Beed

पँथर दनका बौद्ध विहारावरील तारा काढल्याधम्मपाल कांडेकर यांच्या आंदोलनास यश

बीड/प्रतिनीधी

जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध शिव फुले शाहु आंबेडकर लोकशाहीर अण्णा भाऊ साठे या महा मानवांना अभिवादन करून

जेतवन बौद्ध विहार भिम नगर येथील बौद्ध विहारावरील तसेच घरावरील विद्युत तारा काढल्याबद्दल पँथर्स रिपाइं चे म प्रदेश प्रवक्ते तथा बीड जिल्हाध्यक्ष धम्मपाल कांडेकर यांनी फटाक्यांची आतिषबाजी करुन आनंद साजरा केला अधिक माहिती अशी की गेल्या २००७ पासुन हे आंदोलन सुरू होते तेंव्हा सायं दैनिक रणझुंजार यांनी या संदर्भात बातमी प्रकाशित केली होती जेतवन बौद्ध विहारावरील तसेच घरावरील विद्युत तारा काढण्यासाठी पँथर्स रिपाइं चे म प्रदेश प्रवक्ते तथा बीड जिल्हाध्यक्ष धम्मपाल कांडेकर ह्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ कार्यालय बीड तसेच गेवराई येथे पाठपुरावा करत गेवराई शहरातील भिम नगर येथे जेतवन बौद्ध विहार आहे तेथे बौद्ध वंदनेसाठी लहान मुले तसेच समाज बांधव जातात तेंव्हा बौद्ध विहारावरील तारे मधुन पावसाळ्यामध्ये वार्यामुळे झाडांच्या फांद्या या मुळे तारे मधुन जाळ निघतो या जाळामुळे बौद्ध विहार तसेच घराजवळील परिसरात आग लागल्याचा धोका संभवतो तेथे राहणारे समाज बांधव आपला जीव मुठीत घेऊन राहत होते त्या पार्श्वभूमीवर पँथर्स रिपाइं चे प्रदेश प्रवक्ते धम्मपाल कांडेकर यांनी सन २००७ पासुन विद्युत महामंडळ महाराष्ट्र राज्य कार्यालय बीड गेवराई येथे या संदर्भात पक्षाच्या वतीने वेळोवेळी निवेदने देऊन सतत पाठपुरावा केला आणि त्या बौद्ध विहार तसेच घरावरील विद्युत तारा काढल्या त्या बद्दल पँथर्स रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष नामांतर प्रणेते मा मंत्री गंगाधर जी गाडे साहेब पँथर्स रिपाइं च्या कार्याध्यक्षा प्रा सुर्यकांताताई गाडे प्रदेशाध्यक्ष डॉ सिद्धांत जी गाडे यांच्या सह ऊर्जा मंत्री डॉ नितीन जी राऊत साहेब यांनी या संदर्भात वेळोवेळी मदत केली
बौद्ध विहार तसेच घरावरील विद्युत तारा काढल्या बदल भिम नगर गेवराई येथे पँथर्स रिपाइं च्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करुन आनंद व्यक्त करताना या वेळी पँथर्स रिपाइं चे प्रदेश प्रवक्ते तथा बीड जिल्हाध्यक्ष धम्मपाल कांडेकर म्हणाले की ३९ वर्षापूर्वी बांधलेले जेतवन बौद्ध विहार मोडकळीस आले असून ते लवकरात लवकर दीक्षा भूमीसारख्या शिल्पात बांधून देण्यात यावे अशी मागणी त्यांनी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड पालकमंत्री धनंजय मुंडे  यांच्याकडे केली आहे या वेळी उपस्थित सोनाजी अप्पा कांडेकर सिरसट अण्णा अविनाश कांडेकर तलाठी निकाळजे साहेब  सुरेश कांडेकर छावा क्रांतिवीर संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष राहुल चाळक पँथर्स रिपाइं गेवराई तालुकाध्यक्ष भास्कर उघडे युवा तालुकाध्यक्ष संकेत गांगुर्डे गेवराई तालुकाध्यक्ष विद्यार्थी आघाडी अविनाश आडागळे गेवराई शहराध्यक्ष अविनाश साळवे तालुका उपाध्यक्ष विकास वारे आकाश मोरे शेख नजीर भई गाऊंजी दाभाडे बाबासाहेब दाभाडे भिमा पवळे कृष्णा हतागळे भैया कांडेकर  युवा पत्रकार राजु खळगे यांच्या सह समाज बांधव,उपस्थित होते

Sharing

Visitor Counter