हिन्दू बांधवांनी मस्जिदिचे तर मुस्लीम बांधवानी मंदिरांचे दार उघडले-मा.खुर्शिद आलम

हिन्दू बांधवांनी मस्जिदिचे तर मुस्लीम बांधवानी मंदिरांचे दार उघडले
भारत नास्तिकांचा नसुन धर्म माननार्यांचा देश आहे - खुर्शीद आलम
बीड/प्रतिनिधि
कोरोना या महामारीने विश्वभरात थैमान घातलेले आहेत, लोक एकत्र येऊन कोरोना ही महामारी पसरवू नये या उद्देशाने लाॅक डाऊन लावण्यात आले होते.आज धर्म स्थळे वगळता जवळपास 99% टक्के सर्व मार्केट खुले करण्यात आली आहे. फक्त धर्म स्थळेच बंद कशासाठी ठेण्यात आली आहे? हा प्रश्र्न लोकांसमोर निर्माण होऊन लोकांच्या मनात राग पसरलेला आहे भारत देश हा नास्तिकांचे नसुन धर्माला माननारयांचा देश असून या देशातील लोक एकमेकांच्या धर्माचे आदर्श करत आहेत. विग्यानाने कितीही प्रगती केली तरी तो धर्मा पेक्षा महान आणि मोठ्ठा नाहीच म्हणून सर्व धर्म स्थळे उघडून त्यामध्ये कोरोना संकट संपवणेसाठी आणि देशाच्या प्रगतीसाठीचे प्राथना करण्यासाठी धर्म स्थळे खुली करण्यात यावी अशी लोकांची भावना होती म्हणून आज बीड नगरपरिषदेचे माजी सभापती खुर्शीद आलम आणि छत्रपती जानताराजा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश शिंगण यांच्या नेतृत्वात बीड मधील सर्वधर्मिय स्थळे प्राथनासाठी खुली करण्यात आले आहे, या वेळी मुस्लीम बांधव सोबत जाऊन मंदिराचे दार उघडले आहेत तर महेश शिंगण यांनी हिंदू बांधवांसोबत जाऊन मस्जिदीचे दार उघडून दिले आहेत. विशेष म्हणजे कोरोनाच्या या संकटकाळात सुद्धा बीड जिल्ह्य़ात हिन्दु मुस्लिम जातिये सलोखा मजबूत टिकून राहीलेला दिसुन येत होता. हे दृश्य पाहून अनेकांच्या मने भरून आलेली दिसुन येत होती.मास्क आणि सैनिटाईजर चे वापर करावे सोशल डिस्टेंस ठेवावे आणि विनाकारण रस्त्यावर येऊन गर्दी करू नका असे आवाहन नागरिकांना महेश शिंगण आणि खुर्शीद आलम यांनी केले आहे. या वेळी प्रदीपजी काकडे,हा.सैयद मोईन साब, बालाजी भांडवले, मैनुद्दीन भाई, दादासाहेब लंगोटे, म.सादेक, शुभम निंबाळकर, हा.शेखसाब, रवी भाऊ, सोफियान भाई, नागेश जगदाळे, सचिन शेठ शाहनवाज भाई, आदी उपस्थित होते.








