राज्यस्तरीय युवा शारीरिक शिक्षण शिक्षक कार्यकारिणीवर विजय जाहेर यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती

Beed

राज्यस्तरीय युवा शारीरिक शिक्षण शिक्षक कार्यकारिणीवर विजय जाहेर यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती

गेवराई/प्रतिनिधी 

महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ संलग्न युवा शारीरिक शिक्षण शिक्षक राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून  गेवराई येथील न्यू हायस्कूलचे क्रीडा शिक्षक विजय जाहेर पाटील यांची पाच वर्षासाठी राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
विजय जाहेर हे महाराष्ट्र राज्य खो -खो संघटनेचे राज्य पंच आहेत. त्यांनी अनेक खेळाडू तयार केले आहेत. शारदा प्रतिष्ठानच्या खो -खो प्रशिक्षणासाठी त्यांची माजी आ. अमरसिंह पंडित यांनी नियुक्ती केली असून ते कार्य चोखपणे पार पाडत आहेत. ते उच्चविद्याविभुषित असून लवकरच स्पोर्टस्मध्ये त्यांची पीएच.डी. पूर्ण होत आहे. अनेक विषयात ते तज्ज्ञ असून गेवराई येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित न्यू हायस्कूल या शाळेत शारीरिक शिक्षण शिक्षक आहेत. युवा संघटनेने विजय जाहेर यांच्या कार्याची दखल घेऊन राज्य युवा उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
२९ ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून संघटनेने पंचवार्षिक राज्य कार्यकारिणी जाहीर केली आहे.
ही निवड जेष्ठ शिक्षक नेते अविनाश बारगजे यांच्या शिफारशीवरून राज्य अध्यक्ष राजेंद्र कोतकर यांनी जाहीर केली. या नियुक्तीमुळे राज्य कबड्डी संघटनेचे उपाध्यक्ष माजी आ. अमरसिंह पंडित, बीड जि.प. मा.अध्यक्ष विजयसिंह पंडित, शाळेचे मुख्याध्यापक डी.एन. जगताप, रमेशभाऊ शिंदे अमृतजी डावकर,,जेष्ठ क्रीडा शिक्षक तथा जिल्हा कबड्डी संघटनेचे प्रा. राजेंद्र बरकसे आदींनी विजय जाहेर यांचे अभिनंदन करून शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

Sharing

Visitor Counter