राकाँ प्रणित सांस्कृतिक विभाग गेवराई तालुका कार्यकारिणी जाहीर

Beed

राकाँ प्रणित सांस्कृतिक विभाग गेवराई तालुका कार्यकारिणी जाहीर

गेवराई/प्रतिनिधी 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रणित चित्रपट, नाटय, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाची गेवराई तालुक्याची नूतन कार्यकारणी जिल्हाध्यक्ष ऍड. संतोष वारे यांनी जाहीर करून नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र दिले.
प्रा. शरद सदाफुले - तालुका समन्वयक,प्रा. परमेश्वर कडाजी शिंदे  तालुका सरचिटणीस,सुमेध बळीराम भोले - शहर सरचिटणीस,प्रा. प्रमोद सदाशिव झेंडेकर - शहर समन्वयक,अंकुश आतकरे प्रसिद्धीप्रमुख,आनंद भागवतराव दाभाडे -  शहराध्यक्ष,
श्री. शेखर भाऊसाहेब मोटे -तालुका उपाध्यक्ष यांची निवड जाहीर केली. संबंधितांना जिल्हाध्यक्ष ऍड. संतोष वारे यांनी नियुक्तीपत्र दिले.
      राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभाग गेवराईच्या नूतन कार्यकारणीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस  अमरसिंह पंडित, जि. प.चे माजी अध्यक्ष श्री. विजयसिंह पंडित, तालुकाध्यक्ष श्री. भाऊसाहेब नाटकर,विभागीय मराठवाडा अध्यक्ष डॉ. सुधीर निकम, जिल्हा सरचिटणीस प्रा. राजेंद्र बरकसे आदींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Sharing

Visitor Counter