पत्रकार प्रशांत चव्हाण यांना 'ईगल’फाउंडेशन चा राष्ट्रीय गरुडझेप अँवार्ड-2020 जाहीर

पत्रकार प्रशांत चव्हाण यांना 'ईगल’फाउंडेशन चा राष्ट्रीय गरुडझेप अँवार्ड-2020 जाहीर
विशेष प्रतिनिधी (प्रा.रावसाहेब राशिनकर)
कोरोना महामारीच्या कालावधीत तसेच विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केलेल्या सर्व क्षेत्रातील व्यक्तींना ईगल फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेच्यावतीने राष्ट्रीय गरुडझेप अँवार्ड जाहीर करण्यात आलेला आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातून दै. तरुण भारतचे पत्रकार प्रशांत चव्हाण, उद्योजक निलेश शंकरराव चव्हाण व शैक्षणिक क्षेत्रासाठी प्रा. सतीश साठे यांची निवड करण्यात आली आहे. या गौरव मूर्तींना आकर्षक मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, देवून दिग्गज मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. सदर निवड केल्याचे संस्थेचे अध्यक्ष श्री विलासराव कोळेकर, उपाध्यक्ष श्री सागर पाटील, सचिव शेखर सूर्यवंशी ,प्रकाश वंजोळे,बाबासाहेब राशिनकर, सुभाष भोसले, प्रा.तुकाराम पाटील, प्रा.स्मिता गिरी, संजय नवले, प्रा.महेशकुमार मोटे, प्रा.सर्जेराव राऊत, अशोक शिंदे, राजेश जोष्टे यांनी जाहीर केले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने येथील श्री. प्रशांत चव्हाण हे गेली 18 वर्षे पत्रकारितेत निर्भिडपणे सेवा बजावत आहेत. राजकीय विषयावर परखड व सडेतोड लेखणीने आपले मत मांडणे, शब्दांची वैचारिक मांडणी व अभ्यासपूर्ण लेखणी, ग्रामीण भागातील समस्या, वंचित, अन्यायग्रस्तांचे प्रश्न पोडतिडकीने मांडत असतानाच त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला आहे. त्यांच्या पत्रकारितेत केवळ बातम्यांचे वृत्तांकनच नाही तर ग्रामीण साहित्याचे विविधांगी दर्शन घडवून आणणारा एक लेखक म्हणून त्यांचा यानिमित्ताने गौरव होत असल्याचे उद्गार विलासराव कोळेकर यांनी काढले आहेत.
प्रशांत चव्हाण यांच्या लेखणीतून पर्यावरण, निसर्गप्रेम ओतप्रोत भरलेले दिसून येते. तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कूतिक यांसारख्या सर्वच विषयांना परिस्पर्श करण्याचे भाग्य त्यांच्या लेखणीला प्राप्त झाले आहे. दै. पुढारी, दै. सकाळ, महानगर अशा दैनिकांमध्ये त्यांनी मुंबईसारख्या शहरात उपसंपादक म्हणून काम केलेले असतानाच ग्रामीण भागात पत्रकारितेत सेवा बजावताना त्यांनी केलेली उल्लेखनीय कामगिरी गौरवास्पद ठरली असल्याचे कोळेकेर यांनी स्पष्ट केले आहे.
विशेष म्हणजे चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने गावातील पत्रकार प्रशांत चव्हाण व उद्योजक निलेश चव्हाण या दोन सुपूत्रांची एकाचवेळी ईगल फाऊंडेशनच्या राष्ट्रीय गरुडझेप अँवार्डसाठी झालेली निवड ही खऱ्या अर्थाने दुग्धशर्करा योग ठरली असल्याचे गौरोद्गार विलासराव कोळेकर यांनी काढले आहेत. उद्योकजगताला गवसणी घालणारे प्रसिध्द उद्योजक निलेश चव्हाण यांनाही उद्योग क्षेत्रातील चमकदार कामगिरीबद्दल हा पुरस्कार जाहीर झाला आहे. आजपर्यंतच्या ईगल फाऊंडेशनच्या राष्ट्रीय पुरस्कारात एकाच गावातून दोन व्यक्तींची अशी निवड प्रथमच झाली असून या दोन गौरवमूर्तींचे आमच्या फांऊडेशनकडून विशेष अभिनंदन करण्यात येत असून त्यांना पुढील वाटचालीसाठी आमच्या शुभेच्छा आहेत, असे विलासराव कोळेकर यांनी म्हटले आहे.
या राष्ट्रीय पुरस्कारामध्ये येवल्याचे आमदार नरेंद्र दराडे (राजकीय), अँड.संभाजीराव मोहिते (सामाजिक), सहाय्यक पोलीस आयुक्त मनिषा नलावडे (प्रशासकीय), श्री निलेश चव्हाण (उद्योजक), गणेश शेळके (प्रशासकीय), डॉ.सौ.भूमिका प्रतापसिंह बेरगळ (महिला विकास), डी.एस.काटे (अर्थविषयक प्रख्यात लेखक व उद्योजक), शिवाजी चव्हाण (शिक्षण), प्रा.सतिश साठे (शिक्षण), डॉ. जितेंद्र अहिरराव (उच्च शिक्षण), पोपट नलावडे (सामाजिक), डॉ.संजय थोरात (वैद्यकीय), प्रा.सुभाष हुलपल्ले (शिक्षण), प्रशांत चव्हाण (पत्रकार), खंडू दुधभाते (माजी सैनिक), अभिमन्यू शिंदे (शिक्षण), पाकिजा उस्मान पटेल (शिक्षण), राहूल कुंभार (शिक्षण), श्रीकांत सोनवणे (पत्रकार), निवृत्ती सदगीर (शिक्षण), विजय विश्वासराव (शिक्षण), सागर भाट (शिक्षण), प्राचार्य हरिदास विधाते (उच्चशिक्षण), भारत चव्हाण (कला), रामकिशन रौंदळे (राजकीय ), धनाजी बेलेकर (शिक्षण), सौ.पूनम पाटील (उद्योजिका), सौ.संगिता शिवाजी शिंदे (सामाजिक), सुरेश राजे (शिक्षण), मनिषा चौधरी (शिक्षण), शिवलाल राठोड (सरपंच), आयेशा नदाफ (शिक्षण) या गौरव मूर्तींचा समावेश आहे.








