किल्ले धारूर शहराला लागलेली रिक्त पदांची कीड

किल्ले धारूर शहराला लागलेली रिक्त पदांची कीड
किल्ले धारूर/प्रतिनिधी
शहराला रिक्त पदांची कदी ही मोठी समस्या झाली आहे बहुतांश जागेवर प्रभारी असल्यामुळे कामे होताना दिसत नाहीत त्यामुळे धारूर येथील नागरिक हैराण झाले आहेत.
किल्ले धारूर येथे ऑफिस ला प्रभारी अधिकारी असल्याने तसेच कर्मचारी नसल्याने नागरिकांची कामे खोलंबली आहेत धारूर तालुक्याला तहसील प्रशासनाला एक तहसिलदार तीन नायब तहसीलदार, चार मंडळ अधिकारी,चोवीस तलाठी आठ लिपिक पदाच्या जागा असून यात एक नायब तहसीलदार,दोन मंडळ अधिकारी,दोन लिपिक तर तब्बल बारा तलाठ्यांच्या जागा रिक्त असून यात धारूर सज्जा सुद्धा रिक्त आहे यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणत कामे खोळंबली असून नागरिक चकरा मारून हैराण झाले आहे तसेच पोलीस प्रशासनाच्या सुद्धा पोलीस निरीक्षक एक, तर ए. पि.आय.दोन,तर पी.एस.आय च्या तीन जागा असून यात मुख्य पोलीस निरीक्षक यांची जागा रिक्त असल्याने धारूर शहरात मागील दोन महिन्या पासून 7 ते 8 वेळेस चोऱ्या झाल्या असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न सुद्धा उपस्थित होत आहे. मोठ्या प्रमाणत अवैध्ये धंदे चालू असून पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे तसेच पशुवैद्यकीय अधिकारी यांची जागा सुद्धा रिक्त असून प्रभारी हंगामी पदभार स्वीकार आहेत यात पशुवैधनाचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेत सुद्धा तीन कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त असून कामे खोळंबली आहेत किल्ले धारूर येथील नागरिक हैराण झाले असून कायम स्वरूपी अधिकारी येणार कधी हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे








