बीड तालुक्यातील एकल महिला संघटना महिलांच्या वेगवेगळ्या विषयांवर कार्यरत

Beed

बीड तालुक्यातील एकल महिला संघटना  महिलांच्या वेगवेगळ्या विषयांवर कार्यरत

बीड/प्रतिनिधी 

बीड तालुक्यातील एकल महिला संघटना  महिलांच्या वेगवेगळ्या विषयांवर कार्यरत आहे.
प्रत्येक गावात महिलांच्या समस्या दूर करण्यासाठी महिला मंडळ स्थापन करण्यात आले आहेत. मागील काळात गेली 6 महिन्यात ग्रामीण भागातील महिला शेतकरी, विधवा, परिक्तता, गरीब भूमिहीन शेतकरी कुटुंब यांच्यावर आज बेरोजगारी मुळे उपासमारीची वेळ आली आहे. तरी गावातील महिलांच्या चर्चेतून रोजगार मुद्दा समोर आला आहे. 
अनेक गावागावातून महिलांनी गटविकास अधिकारी बीड पंचायत समिती ला महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचा लाभ महिलांना मिळावा यासाठी मागण्याचे निवेदन देण्यात आले आहे.

Sharing

Visitor Counter