मुस्लिम समाजास नौकरी व शिक्षण यात 10% आरक्षण देण्याची मागणी

Beed

मुस्लिम समाजास नौकरी व शिक्षण यात 10% आरक्षण देण्याची मागणी

किल्ले धारुर/इरफान शेख 

 मुस्लिम समाजाची राजकीय, सामाजिक, आर्थिक परिस्थिती मागासलेली असल्याने मुस्लिम समाजास सरकारीनौकरी व शिक्षण यात 10% आरक्षण देण्याची मागणी आज मुस्लिम संर्घष समिती व सर्व मुस्लिम बांधवांनी शासकीय नियमांचे पालन करून तहसिलदार यांच्या मार्फत शासनाकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.  यावेळी आरक्षण अमाच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे अस्या घोषणा देवून प्रशासनाला जागे  करण्याचा प्रयत्न देखील केला                     

मुस्लिम समाजाची आज आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे मागासलेली परिस्तिथी झाल्याने आनेक विद्यार्थी यांनी शिक्षण सोडून उदरनिर्वाहासाठी काम धंदा करू लागले आहेत हुशार असून देखील नौकरीची संधी मिळत नाही 

या समाजाची आरक्षणाची कायदेशीर बाजू संविधानानुसार भक्कम आहे गरज आहे ती शासनाने कायदा करून आरक्षण देण्याची व भेदभाव न करता योग्य पाठपुरावा करण्याची शासनाने       सर्व मुस्लिम समाजाच्या मागणीचा गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर आरक्षण देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे  यावेळी धारूर शहरातील सर्व मुस्लिम बांधव  उपस्थित होते

Sharing

Visitor Counter