वर्ष उलटून गेले तरी तलवाड़ा येथील शेतकरी फ़लबाग अनुदानापासून वंचित

वर्ष उलटून गेले तरी तलवाड़ा येथील शेतकरी फ़लबाग अनुदानापासून वंचित
अनुदान तात्काळ वाटप न केल्यास सुरेश हात्ते यांचा आंदोलनाचा इशारा
तलवाड़ा/वार्ताहर
बळीराजाचं जीवन म्हणजे तारेवरच्या कसरती प्रमाणेच, कधी अवकाळी पावसाचा मारा, तर कधी दुष्काळाचा घाला. आता कोरोना व्हायरसमुळे शेतकरी राजा चिंतेत आहे. अशाच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतक-याचे अतीवृष्टीने फलबागाचे सन 2018-19 मध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या फलबाग नुकसनी पोटी शासनाने अठारा हजार रु हेक्टर फलबागेस अनुदान मंजूर केले आहे.शासनाने नुकसानी पोटी फलबाग अनुदान मंजूर करून एक वर्ष होत आहे तरी अद्याप् पर्यंत अधिका- याच्या हलगर्जीपणा मुले शेतक- याच्या खात्यावर फलबाग अनुदान जमा झाले नाही.सात- आठ महीने कोरोना लॉकडाऊनने जनजीवन ठप्प झाले आहे शेतात पिकवलेले अन्न-धान्य , भाजीपाला,फुकट भाव विकावा लागला तर अनेक वेळा भाजी- पाला फेकून देण्याची वेळ शेतक- यावर आली. या मुल शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडला आहे. त्यातच मौसंबी, डालिंब, या सारखे फलबाग पीके लॉकडाउन मुले अल्प दरात विकावे लागले शासन अनुदान हे शेतक- याला आर्थिक विवांचनेतून वर काढण्यासाठी देते पण तें शेतक- या पर्यंत वेळवर न पोहचल्यास काय उपयोग? खरिप हंगामासाठी उपयोग होईल या आशेने शेतकरी अनुदानाची वाट पाहत होता परंतु संपुर्ण खरिप हंगाम ही सरत आला तरी शासनाने मंजूर केलेले अनुदान ही प्रशासनाच्या दिरंगाईमुळे शेतक- याला मिलाले नसून डोक्यावर कर्जाचा बोजा वाढतच आहे. यास जबाबदार कोन असा प्रश्न तलवाड़ा व परिसरातील शेतक- याला पडला आहे.
नव्याने रुजु झालेले तहसीलदार शेतक-याचे प्रश्न सोडवतील का?
गेवराई तालुक्याला नव्याने रुजु झालेले कर्तव्यदक्ष अशी ख्याती असलेले तहसीलदार मा. सुहास हजारे हे गेवराई तालुक्यातील शेतक- याला त्यांच्या हक्काचे फलबाग अनुदान तात्काळ मिळऊन देतील अशी आशा आता गेवराई तालुक्यातील शेतक- याला लागली आहे.
तलवाड़ा सज्जाचे तलाठि एस.डी.सुलाखे यांना फलबाग अनुदान विषयी विचारणा केली असता त्यानी अनुदान यादी तयार करून तहसील कार्यालय ला दाखल केली होती परंतु अंतरवाली बु. काही शेतक-यानी तक्रार दाखल केली नंतर तहसीलदार यानी एक समिति नेमुन प्रत्यक्ष फलबाग पाहणी करण्यास सूचना दिल्या या प्रक्रियेमुल फलबाग अनुदानास विलंब झाल्याचे सांगितले. तसेच पोईतांडा व अंतरवाली ची कापुस् अनुदान सुधारित यादी ही तहसील कार्यालय ला दाखल केली असल्याचे सांगितले.
तसेच माजी जि. प सदस्य सुरेश हात्ते यांनी ही कित्येक दिवसापासून रखडलेले तलवाड़ा येथील शेतक-यांचे फलबाग अनुदान तात्काळ वाटप करण्या संदर्भात तहसीलदार गेवराई यांना निवेदनाद्वारे कळवले आहे नसता आंदोलनाचा इशारा ही दिला आहे.








