खान अब्दुल रशीद रहेमान यांचा शिक्षक दिनानिमित्त सत्कार संपन्न

खान अब्दुल रशीद रहेमान यांचा शिक्षक दिनानिमित्त सत्कार संपन्न
बीड/प्रतिनिधी
आज दि. 5 सप्टेंबर शिक्षक दिन डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस.हा दिवस शिक्षकांना समर्पित करण्यात आलेला आहे .
या दिवशी गुरुजनांचा मान सन्मान व आदर केला जातो. त्यांना सन्मानित केले जाते. समाजातील त्यांचे महत्त्व वादातीत आहे.
या दिवसाचे महत्त्व म्हणून महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती राज्य शाखा* यांच्यावतीने राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार 2020 साठी निवड करण्यात आलेले आदरणीय खान अब्दुल रशीद अ.रहेमान केंद्रप्रमुख जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कामखेडा ता. जि. बीड यांचा सन्मान श्री कैलास पाळवदे सर जिल्हा उपाध्यक्ष आदर्श शिक्षक समिती श्री शिरसाट विनायक सर जिल्हा सहसचिव आदर्श शिक्षक समिती तसेच श्री मसरुर अन्वर सर क्रीडाशिक्षक मिल्लिया विद्यालय बीड यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
आदरणीय खाँसाहेबांनी आजपर्यंत अनेक प्रशासकीय व संघटनात्मक पदे भूषविलेली आहेत. यामध्ये शिक्षक समिती जिल्हाध्यक्ष,केंद्रप्रमुख संघटना, अल्पसंख्याक शिक्षक संघटना, तसेच मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख अशी पदे भूषवली आहेत त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा








