ऐतिहासिक किल्ल्याचे दुरुस्तीचे काम सुरु सकल मराठा समाज च्या मागणीला आले यश

Beed

ऐतिहासिक किल्ल्याचे दुरुस्तीचे काम सुरु सकल मराठा समाज च्या मागणीला आले यश 

किल्ले धारूर/प्रतिनिधी 

ऐतिहासिक किल्ल्यामध्ये मागील काही वर्षाखाली दुरुस्तीचे काम झाले होते हे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले होते त्यामुळे मागील तीस दिवसांमध्ये नवीन केलेले काम दोनदा ढासळले त्यामुळे सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देऊन काम नव्याने करून त्या गुत्तेदारावर कारवाई करावी अशी मागणी केली होती तरी त्या किल्ल्याचे नव्याने काम सुरू करण्यात आले आहे

   किल्ले धारूर ऐतिहासिक किल्ल्याचे मागील काही वर्षाखाली   सात कोटी रुपये खर्च करून किल्ल्याच्या दुरुस्तीचे काम केली होती या महिन्यामध्ये दोन वेळेस नवीन काम केलेल्या किल्ल्याच्या भिंत कोसळली यामुळे सकल मराठा समाज या संघटनेने तहसीलदारांना दुरुस्तीची व कारवाईची मागणी केली होती लगेच या मागणीला प्रतिसाद देत पुरातन विभागाने त्या गुत्तेदाराला नव्याने काम करण्यास सांगितले व ताबडतोब काम सुरूही झाले त्यामुळे सकल मराठा समाज नितीन शिनगारे  ,बालाजी चव्हाण ,रतन शेंडगे  ,ईश्वर खामकर  ,अतुल शिनगारे यांनी समाधान व्यक्त केले व पुढील काम चांगल्या दर्जाचे व्हावे अशी तहसीलदारांना विनंती केली

Sharing

Visitor Counter