तलवाडा येथील खदाणीत अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ

तलवाडा येथील खदाणीत अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ
हात-पाय बांधलेले असल्याने घात पताचा संशय
तलवाडा/प्रतिनिधी
गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील एका शेतक-याच्या शेतात असलेल्या खदाणीत बुधवारी अनोळखी इसमाचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आल्याने खळबळ उडाली असून मृतदेहाचे हात-पाय बांधलेले असल्याने उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. तलवाडा पोलिस ठाण्याचे सपोनि सुरेश उणवने, जमादार मारोती माने, पो.काॅ.वडकर यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली व मृतदेह ताब्यात घेऊन तलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात गुरूवारी शवविच्छेदन करण्यात आले व त्यानंतर ग्रामपंचायत मार्फत दफनविधी प्रक्रिया पार पाडण्यात आली. मृत व्यक्तीचे अंदाजे वय ६० वर्षे इतके असून पोलिसांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. मृत इसमाला कुणीतरी जिवे मारून त्याचे हात-पाय दोरीने बांधून त्याला खदाणीत टाकले असावे अशी चर्चा तलवाडा परिसरात ऐकावयास मिळत आहे. या इसमाच्या अंगात पांढरा शर्ट व धोतर नेसलेले असा पेहराव असून तो अंगाने जाडजूड असल्याचे दिसत आहे. हा इसम अनोळखी असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही त्या मुळे हा व्यक्ती नेमका कोण हे समजत नसल्या मुळे , या घटने बाबतीत सदर पेहराव वरून ज्यांना ओळख होईल त्या नातेवाईकांनी तलवाडा पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन सपोनि सुरेश उणवने व जमादार मारोती माने यांनी केले आहे.








