श्रीगाव येथे रक्तदान शिबीर संपन्न

श्रीगाव येथे रक्तदान शिबीर संपन्न
श्रीगाव/अलिबाग विशेष प्रतिनिधी
अलिबाग तालुक्यातील श्रीगाव येथे साखर चौथ गौरागणपती उत्सवाचे औचित्य साधुन सार्वजनिक गौरागणपतीग उत्सव मंडळ श्रीगाव यांच्यावतीने व जिल्हा रुग्णालय रक्त पेढी अलिबाग यांच्या सौजन्याने दि.६सप्टेंबर रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते यामधे तिस रक्ताच्या बाटल्यांचे संकलन झाले श्रीगाव येथील गौरागणपती उत्सव दरवर्षी मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो पण यावर्षी कोरोनामुळे सरकारी नियमांचे पालन करुन साधेपणात साजरा झाला यावर्षी मंडळाने श्रीगाव गावात पहिल्यांदा रक्तदान शिबीर भरवुन यशस्वी केले या मंडळाने सामाजीक कार्यात रस्त्यावरील खड्डे भरणे,स्मशानभूमीत लाईट व्यवस्था करणे,लॉकडाऊन मधे जीवनावश्यक वस्तुंचे वाटप,गरजवंतास मदत अशा अनेक प्रकारचे कार्य केले आहे रक्तदान.यशस्वी केल्याबद्दल जिल्हा रूग्णालय रक्त पेढी अलिबागचे डॉ.गोसावी यांच्याहस्ते सार्वजनिक गौरागणपती उत्सव मंडळ श्रीगाव यांचा विशेष गौरवपत्र देउन यथोचित सन्मान करण्यात आला.त्याबद्दल मंडळाचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.








