उध्दव ठाकरे माझे ही मुख्यमंत्री; अरेतुरेची भाषा खपवून घेणार नाही :- खासदार इम्तियाज जलील

Beed

उध्दव ठाकरे माझे ही मुख्यमंत्री; अरेतुरेची भाषा खपवून घेणार नाही :- खासदार इम्तियाज जलील

औरंगाबाद/वार्ताहर 

शिवसेना आणि आमचा पक्ष एकमेकांचे विरोधक आहोत. मात्र उद्धव ठाकरे हे माझेही मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या विरोधात अरेतुरेची भाषा सहन करणार नाही, असे वक्तव्य खासदार इम्तियाज जलील यांनी केले आहे. कंगना राणावत हिलाही अशी भाषा योग्य नसल्याचे त्यांनी बजावले.

राज्यात अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेना यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. मुंबई महानगर पालिकेने अभिनेत्री कंगना राणावत हिच्या कार्यालयातील बेकायदा बांधकामावर कारवाही केली. या कारवाईनंतर कंगना राणावत हिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अरेतुरेची भाषा वापरली. या अरेतुरेच्या भाषेबाबत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली.

शिवसेना हा पक्ष जरी आमचा राजकीय विरोधक असला तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे आणि माझेही मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या विरोधात अशा प्रकारची भाषा वापरणे अयोग्य आहे. अशा प्रकारची भाषा मुख्यमंत्र्यांबद्दल वापरणे केव्हाही अस्वीकारार्ह आहे, असेही इम्तियाज जलील म्हणाले.

Sharing

Visitor Counter