वादळी वाऱ्यासह पावसाने पिकांचे नुकसान

Beed

वादळी वाऱ्यासह पावसाने पिकांचे नुकसान

सरवर पिंपळगाव ,सोंमठाना शिवारात ऊसे पडली

गंगामसला/शेख अबुजर 

माजलगाव तालुक्यातील गंगामसला मंडळात झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने .सोमठाणा. सरवर पिंपळगाव व परिसरात आज दीं.७.व ८ सप्तेंबर  रोजी मागील एक दोन  दिवसापासून जोरदार पावसाने हजेरी लावल्याने परिसरातील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. ऊस पूर्ण पणे जमीन दोस्त झाले आहे .पिकांचे नुकसान झाले असून आता शेतकऱ्यांना  आस्मानी संकटाला सामोरे जावे लागते आहे.आधीच शिवारात आसमानी संकटाने पिकांचे नुकसान होत आहे. तरी शेतकरी वर्गाने जगावे तरी कसे असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत.
                   दरम्यान सरवर पिंपळगाव शिवारातील ऊस पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने परिसरातील ऊस  जमीन दोस्त झाला आहे.अनेक शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.नुकसान झालेल्या उसाचे तत्काळ पंचनामे करावे.व  नुकसान भरपाई मिळावी म्हणून शेतकरी वर्गातून मागणी होत आहे.

Sharing

Visitor Counter