कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी बिस्मिल्ला खान यांना संधी द्या

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी बिस्मिल्ला खान यांना संधी द्या
अल्पसंख्याक चेहरा म्हणून संधी अपेक्षित.!
माजलगाव / प्रतिनिधी
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक यांची मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी निवड झाल्यामुळे माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतीपदी अल्पसंख्याक चेहरा म्हणून माजी पंचायत समितीचे सदस्य तथा सोमठाणा येथील विद्यमान सरपंच बिस्मिल्ला खान पठाण यांची निवड करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली असल्याचे चित्र अल्पसंख्याक समाजाच्या वतीने करण्यात येत आहे.
माजी मंत्री आमदार प्रकाश सोळंके आता कोणाला ह्या पदाचा मान देतात त्या कडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे. त्यातच आता स्थानिक पातळीवर बाशिंग बांधण्यास सुरुवात झाली असून .त्यात माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बिस्मिल्ला खान यांचे नाव सद्यातरी आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे
अल्पसंख्याक चेहरा म्हणून बिस्मिल्ला खान यांच्या रूपाने माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी विराजमान होण्याची संधी चालून आलेली आहे.
खान यांनी राष्ट्रवादी पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते राहिले असून ज्या ज्या वेळेस पक्षश्रेष्ठींनी दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडली.पक्ष वाढीसाठी त्यांचे परिश्रम पाहता त्यांना संधी देणे अपेक्षित असल्याचे जाणकार यांचे मत आहे
तसा बिस्मिल्ला खान यांचा स्वभाव हा मितभाषी प्रेमळ असून त्यांची सर्व समान्यासाठी काम करण्याची धडपड, शेतकरी,शेत मजूर यांच्या समस्या चे निराकरण करण्यासाठी चोवीस तास उपलब्ध असतात.त्यांचा अनुभव हा दांडगा असून त्यांनी माजलगाव पंचायत समितीच्या उपसभापती पदाची जबाबदारी पार पाडली आहे.सेवा सोसायटी चे चेरमन पद असेल कींवा सोमठाना ग्रामपंचायत असेल त्यांचा अनुभव हा सर्व सामान्य माणसाला न्याय देण्याचा नेहमी प्रयत्न करण्याची त्यांची धरपड. आमदार प्रकाश सोळंके यांच्या बरोबर 20-25 वर्षा पासुन निष्ठा पूर्वक जे काम केले त्या कामाचा फायदा बिस्मिल्ला खान यांना मिळणार का हा सर्व सामान्य माणसाला पडलेले प्रश्न असून ह्या कडे आमदार प्रकाश सोळंके ही संधी देणार का ह्या कडे अता तालुक्याच्या नजरा लागल्या आहेत..
तालुक्यात आता पर्यंत नगर पालिकेची निवडणूकी नगराध्यक्ष पदासाठी अल्पसंख्याक उमेदवार न दिल्याने झालेला पराभव वगळता माजी मंत्री, आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व राहिले असून त्यामुळे येणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून श्री खान यांना संधी देणे हेच उचित राहील याचा फायदा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत नक्कीच मिळेल असे मत जाणकार व्यक्त करीत आहे.








