शहरातील भाजीमंडई , कोर्ट , सरकारी दवाखाना , पोलीस अधिक्षक कार्यालय , बार्शी नाका , हैद्राबाद बँक , माळीवेस शौचालय तयार करा-शेख पाशा
Beed

शहरातील भाजीमंडई , कोर्ट , सरकारी दवाखाना , पोलीस अधिक्षक कार्यालय , बार्शी नाका , हैद्राबाद बँक , माळीवेस शौचालय तयार करा-शेख पाशा
बीड/प्रतिनिधी
शहरातील भाजीमंडई , कोर्ट , सरकारी दवाखाना , पोलीस अधिक्षक कार्यालय , बार्शी नाका , हैद्राबाद बँक , माळीवेस आदी ठिकाणी बाहेरगावाहुनमहिला पुरुषांची गर्दी असते . या ठिकाणी शौचालय तर नाहीतच मात्र मुताऱ्याची दयनीय अवस्था झालेला आहे . अशात लघुशंकेसाठी व शौचासाठी अडचणी निर्माण होत आहेत . यामुळे महिलांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे . तरी महिला वर्गाची अडचण लक्षात घेऊन शहरातील वरील ठिकाणी सार्वजनिक शौचालय निर्मीती करावी . देखरेखीसाठी स्पेशल माणसांची , महिलांची नियुक्ती करावी . यामुळे अनेक हाताला काम मिळेल व महिलांची अडचण दुर होईल अशी मागणी शेख पाशा यांनी आपल्या निवेदनद्वारे केली आहे.








