निरोप समारंभानंतर नेकनूर वरुन बीडला येत असताना कारला अपघात होऊन त्यांचा अपघाती मृत्यू
Beed

निरोप समारंभानंतर नेकनूर वरुन बीडला येत असताना कारला अपघात होऊन त्यांचा अपघाती मृत्यू
बीड/प्रतिनिधी
बीड पोलिस दलातील पो.ह.महेश आधटराव,(ने.- नेकनूर) हे गेवराई येथे बदली झाल्याने काल रात्री निरोप समारंभानंतर नेकनूर वरुन बीडला येत असताना कारला अपघात होऊन त्यांचा अपघाती मृत्यू झाला.सन 2006 मध्ये बीड पोलीस दलामध्ये भरती होऊन त्यांनी HQ,पेठबीडPS,DSB,ACB,आणि नेकनूरPS अशी 15 वर्ष उल्लेखनीय सेवा दिली.या सेवेमध्ये त्यांना 66 बक्षीस प्राप्त आहेत.त्यांनी कर्तव्यदक्षतेने काम करताना सामाजिक कार्याची जोड जोपासली आहे.नुकतेच लॉकडाउन कालावधीत त्यांनी लिंबागणेश गावात वादळी वाऱ्यामुळे उडालेले वृद्ध दाम्पत्याचे घर पूर्ववत करून देऊन खाकीतील माणुसकी दाखवली होती.या बीड पोलिसांच्या कर्तव्यदक्ष सेनानीला भावपूर्वक श्रद्धांजली!








