भाजी-पाला आडत मार्केट मध्ये घाणीचे साम्राज्य !

भाजी-पाला आडत मार्केट मध्ये घाणीचे साम्राज्य !
भाजी पाला विकता की कचरा?लोकांचा प्रश्न!
बीड/प्रतिनिधी
बीड शहरातील काकू नाना भाजीपाला अडत मार्केट मध्ये घाणीचे साम्राज्य असल्याने लोकांचे आरोग्य धोक्यात असल्याचे सपष्ट चित्र दिसत आहे. कोरोना सारख्या आपत्ती मध्ये प्रशासनाकडुन कठोर प्रयत्न चालु आहे व प्रत्येक ठीकाणी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे परंतु बीड शहराला ठोक भाजीपाला व्यापार करणार्या अडत मार्केट मध्येच घाणीचे साम्राज्य दिसत आहे.
बीड शहरांमधील काकू नाना आडत मार्केटची अवस्था अशी झालेली दिसते की जणू त्या ठिकाणी भाजीपाला ऐवजी कचराच विकला जातो की काय ?अशा अवस्थेतून बीड शहरातील वेगवेगळ्या भागात किरकोळ व्यापारी भाजीपाला खरेदी करून विकतात व तोच भाजी पाला प्रत्येक नागरीक खरेदी करत असतो.
गलथान कारभार कुनाचा! नगर पालिका की ठोक व्यापार्यांचा?
कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर प्रशासन आपली चांगलीच भूमिका पार पाडत आहे परंतु या ठिकाणी नगरपालिका व व्यापार्यांच्या गलथान कारभारामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात असल्याचे सपष्ट चित्र दिसत आहे व कोरोनाच्या या माहामारीत अशा घाणीच्या साम्राज्यात भाजीपाला कसं काय विकला जाऊ शकतो ? का कोणालाच कचरा दिसत नाही ? अशे प्रश्न नागरिकांना निर्माण होत आहेत.
नगर पालिकेला सतत निदर्शनास आणून दिले !
नगरपालिकेचे घंटागाड्याची व्यवस्था नगराध्यक्षांच्या हस्ते करण्यात आली आहे परंतु घंटा गाड्या कुठे आहेत?असा सवाल उपस्थित होत आहे कारण या ठिकाणी एक ही घंटा गाडी येवून कचरा उचलताना दिसत नाही दररोज विकल्या जाणाऱ्या भाजीपाला मार्केटमध्ये दररोज कचरा उचलावा,थोडीशी पण घाण नसु नये,या ठीकाणचा भाजीपाला दररोज बीड शहरातील विविध भागात विकला जातो यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आहे मात्र नगर पालिकेला काही एक पडलेलं दिसत नाही.








