बिंदुसरा धरण 100% भरले,सांडव्यावरुन पाणी वाहत आहे

बिंदुसरा धरण 100% भरले,सांडव्यावरुन पाणी वाहत आहे
बीड/प्रतिनिधी
बिंदुसरा धरण प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरलेले असुन सदर धरणाच्या छोटया व मोठया , सांडव्यावरुन पाणी पडत आहे . असे उपविभागीय अधिकारी पाटबंधारे उपविभाग बीड यांनी कळविले आहे . तथापी आपणास सुचित करण्यात येते कि येत्या काळात संबधीत यंत्रणाच्या नियमीत संपर्कात राहून योग्य ती काळजी घेण्यात यावी . नदीकाठच्या गावांना याची कल्पना देण्यात यावी सदर नदीस येणाऱ्या पुरामूळे प्रमुख मार्ग व इतर मार्गावरिल रस्त्यावरिल पुल व कठडे तुटल्याने जिवित आणि वित्त हानी होऊ शकते त्याअनुषंगाने बीड शहरातील व आपल्या विभागाचे अखत्यारितील पुल , रस्ते , यांची पाहणी करावी व दिशादर्शक फलक लावण्यात यावीत , जेणे करुन बिंदुसरा नदीच्या पुरामुळे नागरीकांची जीवित व मालमत्तेची हानी टाळण्यासाठी योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात . तसेच कोणत्याही प्रकारची नुकसान होऊन आपत्कालीन परिस्थीती निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी .असे आवाहन करण्यात आले.








