राष्ट्रवादी महिला काँग्रेस पदाधिकाऱ्यांची नियुक्ती व बूथ कमिटी नियोजन

Beed

राष्ट्रवादी महिला काँग्रेस पदाधिकाऱ्यांची नियुक्ती व बूथ कमिटी नियोजन

बीड/प्रतिनिधी

बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे साहेब यांच्या सूचनेवरून व राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष सौ. रूपाली ताई चाकणकर  व  मा.आमदार  बाळासाहेब अजबे (काका ) , मा,आमदार  संदीप भय्या क्षीरसागर मार्गदर्शनाखाली आज बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीची  बैठक संपन्न झाली. या बैठकी मध्ये प्रदेश कार्यकारिणी, जिल्हा कार्यकारिणी, तालुका कार्यकारिणी, तसेच त्याअंतर्गत प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी आपल्या भागातील बूथ कमिटी कशाप्रकारे स्थापन करून आपल्या भागातील महिलांशी मोठ्या प्रमाणात संपर्क साधला जाईल आणि संघटन कसे वाढवता येईल या विषयावर चर्चा झाली. 

यावेळी काही नव पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये पाटोदा तालुकाध्यक्ष म्हणुन सौ. नीला सुनील पोकळे, पाटोदा तालुका उपअध्यक्ष पदी सय्यद अंजुम, सिराजुद्दीन  पाटोदा शहर अध्यक्ष पदी सौ.  कुशीवर्ता नारायण नागरगोजे, यांची नियुक्ती करण्यात आली. 

पक्ष बळकटीसाठी व महिला संघटन मजबूत करण्यासाठी पक्षाची ध्येय धोरणे सर्व सामान्य माणसापर्यंत पोहचवण्यासाठी चर्चा करण्यात आली. आजच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सौ. नेहाताई क्षीरसागर, बीड जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्ष सौ. संगीता के. तुपसागर  त्यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पत्र देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी महिला आघाडी उस्मानाबाद निरीक्षक; प्रज्ञा ताई खोसरे, माधुरी घुमरे , राणी ताई, नीबांळकर ताई, नीला ताई, अंजुम ताई, नागरगोजे ताई, यांसह राष्ट्रवादी महिला आघाडी च्या सर्व पदाधिकारी उपस्थित होते .

Sharing

Visitor Counter