शिक्षकभरती विशेष परवानगीसाठी निवेदन सादर

Beed

शिक्षकभरती विशेष परवानगीसाठी निवेदन सादर

 बीड/प्रतिनिधी 

डीटीएड बीएड स्टुडंट असोसिएशन महाराष्ट्र राज्यच्या वतीने पाच सप्टेंबर 2020 वीस पासून औरंगाबाद ते मुंबई पायी दिंडी आंदोलनास सुरुवात झाली आहे,  संघटनेचे अध्यक्ष संतोष मगर सर दिंडीचे नेतृत्व करत आहेत. covid-19 संसर्गाची जाणीव ठेवत अगदी मोजक्या सहकाऱ्यांसह ही दिंडी आम्ही काढलेली आहे.राज्य उपाध्यक्ष संदीप कांबळे, जीवन काकडे, तुषार शेटे इत्यादी सहकारी दिंडीत सहभागी आहेत. गेली अकरा दिवस हे तरूण पायी मुंबईकडे निघालेले आहेत. संघटनेची मुख्य मागणी शिक्षक भरतीसाठी विशेष परवानगी मिळवणे ही आहे कारण 2017 मध्ये सुरू झालेली शिक्षक भरती 24 हजार अजूनही पूर्ण झालेली नाही दरम्यान 2019 मध्ये 12000 पदभरती  करायची असताना केवळ 5800 पदभरती झाली, व पुढे कोरोनाच्या परिस्थितीमुळे भरतीला स्थगिती देण्यात आली परंतु ही नवीन भरती नसून तीन वर्षापासून ची भरती आहे तरीही भरती त्वरित सुरळीत करावी अशी संघटनेची मागणी आहे. उर्वरित भरतीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे मंजुरीस पाठवण्यात आलेला आहे परंतु आज सरकारमधील कोणीही शिक्षक भरतीची दखल घेत नाही त्यामुळे डीटीएड बीएड स्टुडंट असोसिएशन ही आक्रमक झाली आहे, हजारो सुशिक्षित बेरोजगार d.ed b.ed धारक भरतीकडे आस लावून आहेत. सरकारने लवकरात लवकर रखडलेली शिक्षक भरती पूर्ण करावी ही संघटनेची मागणी आहे., दरम्यान संघटनेच्या बीड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी बीड कलेक्टर ऑफिसला यासंबंधीचे निवेदन दिले आहे. त्यावेळी संघटनेच्या राज्यउपाध्यक्ष अर्चना सानप, बीड जिल्हा अध्यक्ष मंगलताई मारगुडे, बीड जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक महादेव जगताप, राज्य संघटक शरद पिंगळे, बीड जिल्हा कार्याध्यक्ष प्राध्यापक प्रशांत पंडित इत्यादी उपस्थित होते.

Sharing

Visitor Counter