कवयित्री प्रीती पाटील यांना राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक

Beed

कवयित्री प्रीती पाटील यांना राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक

साहित्य क्षेत्रातील मान्यवर व मित्रपरिवारांकडून अभिनंदनाचा वर्षाव

 अहमदनगर विशेष प्रतिनिधी (प्रा.रावसाहेब राशिनकर)
 
 साहित्य क्षेत्रात नावाजलेल्या शब्दशृंगार साहित्य मंच महाराष्ट्र ,या समूहात स्वातंत्र्य दिनानिमित्त स्पर्धेचे  आयोजन करण्यात आले होते या मध्ये महाराष्ट्रातील अनेक नवोदित व सुप्रसिद्ध नामवंत साहीत्यीकांनी सहभाग नोंदवून स्पर्धेला भव्य दिव्यं रूप प्राप्त करुन दिले होते .या स्पर्धेचा निकाल सोमवार दि.१४ सप्टेंबर रोजी रात्री ८:०० वाजता समुह प्रमुख विशाल पाटील  यांनी अनेक साहित्यीकांच्या ऑनलाईन उपस्थीतीत जाहीर करुन विजेत्यांचा रोख रक्कम,आकर्षक सन्मानपत्र देऊन गौरव  केला.या स्पर्धेत प्रथम सन्मानाचे मानकरी कवियत्री प्रिती पाटील, खारघर, नवी मुंबई.सन्मानपत्र व रोख ५०१ रु. , द्वितीय:कवी लीलाधर दवंडे कामठी, नागपूर.  सन्मानपत्र व रोख ३०१ रु.तृतीय:- कवियत्री सौ. सीमा भांदर्गे, अमरावती.सन्मानपत्र व रोख १०१ रु.आणी उत्तेजनार्थ:- कवी दिलीप विठ्ठलराव थुल, पुलगाव, वर्धा सन्मानपत्र व रोख १०१ रु.या स्पर्धेसाठी  परीक्षक म्हणुन  सुप्रसिद्ध कवी/लेखक श्री. हरिदास कोष्टी, सर.यांचे योगदान  लाभले ,स्पर्धेचे आयोजन  कवी/लेखक श्री. प्रदिप हिवरखेडे यांनी केले होते.या स्पर्धेत महाराष्ट्रातील अनेक नवोदितांनी व सुप्रसिद्ध  तब्बल २०० कवींनी सहभाग नोंदवला होता. त्यातील निवडक रचनाचे लवकर ई काव्यसंग्रह शब्दशृंगार साहित्य मंच,प्रकाशित करणार आहे. या भव्य राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावल्याबद्दल कवयित्री प्रीती पाटील यांच्यावर नातेवाईक, मित्रपरिवार, साहित्य क्षेत्रातील कवी -कवयित्री ,यांच्या कडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Sharing

Visitor Counter