मयतीस जाणार्या इसमावर हल्ला करणारे आरोपीस जेरबंद

Beed

 आज दि. 16.09.2020 रोजी यातील फिर्यादी निजामुद्दीन खमरोद्दीन काझी वय 49 वर्षे रा . कसबा विभाग धारुर हे त्यांचे मित्र अब्दुल अफीज हे मरण पावले असल्याने त्यांचे मयतीस साथीदारासह डस्टर गाडी क्रमांक एम.एच. - 42 एक्स 4275 ने धारुर येथुन केज मार्गे अंबाजोगाई कडे जात असतांना होळ येथील नदी पुलावर कार बंद पडली म्हणुन कारचे बोनट उघडुन पाहीले तर कुलंट ( पाणी ) संपल्याने त्यांचे सोबतचे सय्यद लाईक , सोहेल तांबोळी हे पाणी आणण्यासाठी एका घराकडे गेले व फिर्यादी व साक्षीदार हे गाडीजवळ थांबले असता एक मोटार सायकलवर अज्ञात दोन इसम आले . त्यांच्यात किरकोळ कारणा वरुन बाचाबची झाली व शिवीगाळ केली . फिर्यादी व साक्षीदार यांनी शिवीगाळ करु नका असे म्हणताच त्यांनी त्यांचे मोबाईलवरुन फोन करुन इतर चार साथीदारांना बोलावुन घेऊन त्यांचे हातातील लाकडी दांडयाने व दगडाने जिवे मारण्याच्या उद्देशाने जखमी सोहेल तांबोळी यास डोकीत तसेच फिर्यादी व साक्षीदार यांना मारहाण करुन गंभीर दुखापत केली आणि डस्टर गाडीवर दगडफेक करुन काचा फोडुन गाडीचे नुकसान केले . सदरचे आरोपी हे हिंदु समाजाचे आहेत , वैगेरे मचकुराचे फिर्यादवरुन पो.स्टे . युसुफवडगांव येथे गु.र.नं. 190/2020 कलम 307,324,323,147,148,149,504,427 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल आहे . सदरचा गुन्हा हिंदु मुस्लीम अशा दोन धर्माशी संबधीत व्यक्तीमध्ये झाला असल्याने , गुन्हयाचे घटनास्थळी मा . पोलीस अधिक्षक साहेब , बीड , अ.पो.अ. मॅडम , अंबाजोगाई , उपविभागीय पोलीस अधिकारी , अंबाजोगाई , पो.नि. स्थानिक गुन्हे शाखा , बीड , स.पो.नि. पो.स्टे . युसुफवडगांव यांनी भेट दिली . मा . पोलीस अधिक्षक साहेब , बीड यांनी गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेऊन , गुन्हयातील आरोपी निष्पन्न करुन त्यांना तात्काळ अटक करण्याचे आदेश पो.नि. स्था.गु.शा. व सपोनि यु.वडगांव यांना देऊन आरोपी शोध कामी वेगवेगळे पथके तयार करुन रवाना केली . त्यादरम्यान स्था.गु.शा.चे तसेच पो.स्टे.चे अधीकारी व कर्मचारी यांनी 15 संशयीत लोकांना ताब्यात घेऊन गुन्हयाबाबत विचारपुस केली . त्यादरम्यान पो.नि.स्था.गु.शा.यांनी गोपनीय माहीती काढुन त्यांना मिळालेल्या माहीती वरुन दोन संशयीत इसमांना होळ येथुन ताब्यात घेऊन त्यांना नांव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1. नारायण धनराज घुगे , 2. राहुल तुकाराम घुगे दोन्ही रा . होळ ता . केज असे सांगितले . त्यांना गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्यांनी त्यांचे इतर चार साथीदारसह गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने , आरोपींना अटक करण्यात आली असुन पुढील तपास सपोनि आनंद झोटे पो.स्टे . यु.वडगांव करीत आहेत.उर्वरीत आरोपींना अटक करणेसाठी स्था.गु.शा. व पो.स्टे.ची पथके रवाना केली आहेत . अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी गुन्हयातील आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई तसेच प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याचे प्रस्तावित आहे . सदरची कामगिरी मा . पोलीस अधीक्षक , श्री.हर्ष ए पोद्दार , मा.अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती , स्वाती भोर , उप विभागीय पोलीस अधिकारी , अंबाजोगाई श्री . राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.श्री.भारत राऊत , सपोनि आनंद झोटे , पो.स्टे . यु.वडगांव , पो.उप.नि. श्री . संतोष जोंधळे , पोउपनि श्री.गोविंद एकीलवाले , श्रीमंत उबाळे , गोरख मिसाळ , बालाजी दराडे , कैलास ठोंबरे , प्रसाद कदम , सतिष कातखडे , मनोज वाघ , अशोक दुबाले , राहुल शिंदे , असेफ शेख , सोमनाथ गायवाड , वाहन चालक मुकुंद सूस्कर , राजु वंजारे , अतुल हराळे यांनी केलेली आहे .

Sharing

Visitor Counter