जनविकास आणि गुड शेअर व अरविंद अँडव्हान्स मटेरिअल्सच्या वतीने धारूर येथे एन-९५ मास्कचे वाटप

जनविकास आणि गुड शेअर व अरविंद अँडव्हान्स मटेरिअल्सच्या वतीने धारूर येथे एन-९५ मास्कचे वाटप
धारूर/प्रतिनिधी
अहोरात्र कोरोनाशी लढा देणारे डॉक्टर्स, पोलीस, पत्रकार, सफाई कर्मचारी आणि आरोग्य यंत्रणेशी निगडीत असलेल्यांना जनविकास सामाजिक संस्था, गुड शेअर आणि अरविंद अँडव्हान्स मटेरिअल्सच्या वतीने धारूर येथे एन-९५ मास्कचे वाटप करण्यात आले.
या बाबतची माहिती अशी की, कोरोनाशी लढणारे व रुग्णांवर उपचार करून त्यांची शुश्रूषा करीत असलेले डॉक्टर्स, नर्सेस तसेच कोरोना रोखण्यासाठी जीव धोक्यात सफाई कामगार. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी ऑन ड्युटी २४ तास सेवा करणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच कुटुंबाची पर्वा न करता वार्तांकन करणारे पत्रकार आणि माध्यम प्रतिनिधी तसेच अंगणवाडी व आशा स्वयंसेविका यांना जनविकास सामाजिक संस्था आणि गुड शेअर व अरविंद अँडव्हान्स मटेरिअल्स यांच्या संयुक्त विद्यमाने धारूर येथील पोलीस स्टेशन, ग्रामीण आरोग्य केंद्र, नगर परिषद, कोव्हिड उपचार केंद्र येथे जनविकास सामाजिक संस्थेचे रमेश भिसे आणि गुड शेअर व अरविंद अँडव्हान्स मटेरिअल्स यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आरोग्य संघटनेने शिफारस केलेले एन-९५ मास्क वाटप करण्यात आले. या प्रसंगी धारूरचे नगराध्यक्ष डॉ स्वरूपसिंह हजारी, बाळराजे गायकवाड, मुख्याधिकारी नितीन बागुल, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती धस मॅडम, राज्य मराठी पत्रकार परिषदेचे अनिल महाजन, वैद्यकीय अधिक्षक डॉ. आदमाने, सहाय्यक प्रकल्प अधिकारी किरण नेहरकर, कार्यालयीन अधीक्षक नितीन ईघाते, स्वच्छता निरीक्षक सचिन डावकर, कोव्हीड केंद्राचे कर्मचारी, पत्रकार गौतम बचुटे, विजय भिसे, मच्छिंद्र लांडगे, आशा कापसे, स्वाती अंकुशे यांच्यासह प्रमुख मान्यवर यांची उपस्थिती होती.








