"होळ येथील घटना हल्ला कि मॉब लिंचिंग? - पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया"

"होळ येथील घटना हल्ला कि मॉब लिंचिंग? - पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया"
बीड/प्रतिनिधी
धारूरचे तब्लिगी जमातचे प्रमुख निजामुद्दीन काझी हे १६ सप्टेंबर रोजी आपले मित्र अब्दुल हाफिज यांच्या अंत्यविधीसाठी चारचाकी वाहनाने धारूर येथून केज मार्गे अंबाजोगईला जात असतांना वाहनांमध्ये काही तांत्रिक अडचणी झाल्याने होळ येथील पुलावर गाडी बंद पडल्याने थांबले होते. काझी निजामुद्दीन यांच्यासोबत सोहेल तांबोळी व इतर दोन मित्र या प्रवासात सोबत होते. गाडीसाठी पाणी आणण्यासाठी दोघे जण गावाकडे गेले व निजामुद्दीन काझी आणि सोहेल तांबोळी हे गाडीजवळच थांबले असताना साडेनऊच्या सुमारास आरोपी नारायण घुगे आणि राहुल घुगे या समाजकंटकांनी दुचाकीवर येऊन काझी निजामुद्दीन आणि सोहेल यांची वेशभूषा बघून त्यांना जातीवाचक शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. पीडितांनी शिविगाळ का करता विचारले असता आरोपींनी फोनवरून इतर काही साथीदारांना मॉबलिंचिंगच्या उद्देशाने बोलावून घेतले.जसेच हे साथीदार पुलावर आल्यास काझी निजामुद्दीन आणि सोहेल यांच्यावर लाठ्या काठ्या व दगडाने जीवे मारण्याच्या उद्देशाने तीव्र हल्ला करण्यात आला हा. हल्ला एवढा गंभीर होता की काझी निजामुद्दीन रक्तबंबाळ होऊन बेशुद्धावस्थेत जमिनीवर कोसळले त्यांचा बचाव करण्यास गेलेल्या सोहेल तांबोळी यांना डोक्यावर एका पाठोपाठ अनेक वार झाल्याने तेही रक्तबंबाळ होऊन खाली पडले दोघे पीडित जमिनीवर पडल्याने आरोपींनी लाथांनी व काठ्यांनी मारण्यास सुरुवात केली या हल्ल्यात दोन्ही पीडित हे गंभीर स्वरूपात जखमी असून त्यांना अंबाजोगाई येथील स्वाराती दवाखान्यात दाखल करण्यात आलेले आहे.आरोपींनी पीडितांच्या गाडीचेही दगडफेक करून नुकसान केले. या घटनेत पोलिसांनी आरोपी नारायण घुगे, राहुल घुगे आणि एक जण असे तीन जणांना आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे.
महाराष्ट्रात या प्रकारची घटना म्हणजे खूपच चिंतेची बाब आहे. या घटनेमुळे सर्व जिल्ह्यातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत या घटनेचा पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेकडून तीव्र निषेध करण्यात आले आहे व पीडितांची भेट घेऊन त्यांना कायदेशीर कारवाईसाठी सर्वतोपरी मदत केली जाईल असे आश्वासन पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेकडून पीडितांना देण्यात आले व प्रशासनाने या मॉबलिंचिंगमध्ये सामील सर्व आरोपींवर कडक कारवाई करावी जेणेकरून भविष्यात जिल्ह्यात अशी मॉब लिंचिंग सारखी घटना पुन्हा घडू नये अशी मागणी करण्यात आली.








