धारूर बाजार समितीचे संचालक पदी सचिन मैंद यांची निवड

धारूर बाजार समितीचे संचालक पदी सचिन मैंद यांची निवड
धारूर/प्रतिनिधी
तालूक्यातील मैंदवाडी येथील भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते सचिन मैंद यांची धारूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पदी निवड करण्यातआली असून त्यांच्या निवडी नंतर कार्यकर्त्यानी आनंद उत्सव साजरा केला
धारूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळाचे सर्वसाधारण बैठकीत बाजार समितीचे संचालक म्हणूण मैंदवाडी येथील सरपंच व युवक कार्यकर्ते सचिन मैंद याची संचालक पदी निवड करण्यात आली.ते गेल्या पंधरा वर्षा पासून भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणूण काम करतात .त्यांचे एकनिष्ठ कार्य व शेतकरी व सर्वसामन्याचे प्रश्ना मार्गी लावण्या साठी असणारी धडपड यामुळे त्यांची संचालक पदी निवड करण्यात आली असून त्यांची निवड झाल्या वर सभापती महादेव बडे उपसभापती सुनिल शिनगारे संचालक महादेव तोंडे अॕड पांचाळ नगरसेवक बालाजी चव्हाण भाजपाचे तालूकाध्यक्ष अॕड बालासाहेब चोले सचिव दत्ताभाऊ सोंळके आदीनी त्यांचा सत्कार करून त्यांचे निवडीचे कौतूक केले.त्यांचा सत्कार केला. यावेळी फटाके वाजवून पेढे वाटून आनंदउत्सव साजरा केला








