मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या वाढदिवसा निमित नगराध्यक्ष डॉ.स्वरुपसिंह हजारी यांच्या हस्ते साड्यांचे वाटप

मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या वाढदिवसा निमित नगराध्यक्ष डॉ.स्वरुपसिंह हजारी यांच्या हस्ते साड्यांचे वाटप
किल्लेधारुर/प्रतिनिधी
भारत देशाला संपूर्ण विश्वामध्ये सन्मानाचे स्थान प्राप्त करून देणारे आपले लोकप्रिय पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी साहेब यांचा १७ सप्टेबंर रोजी जन्मदिवस आसून त्याचे जन्मदिवसाचे औचित्य साधून संपूर्ण देशभरात हा सप्ताह सेवा सप्ताह म्हणून साजरा केला जातो. धारूर तालुका व शहरामध्ये भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा नगराध्यक्ष डॉ. स्वरूपसिंह हजारी साहेब यांच्या मार्गदर्शना खाली विविध सेवाभावी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे त्याचा एक भाग म्हणून मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७० वा वाढदिवस असल्यामुळे शहरातील ७०विधवा माहिला भगीनींना साड्यांचे वाटप करण्यात आले त्यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा नगराध्यक्ष डॉ. स्वरुपसिंह हजारी साहेब, उपनगराध्यक्षा सौ.मिनाक्षी ताई गायकवाड,बांधकाम सभापती सौ. ज्योती ताई सिरसट,नगरसेवीका ज्योती ताई गायसमुद्रे,बाळासाहेब गायकवाड,ता.अध्यक्ष अॅड.बालासाहेब चोले ,शहराध्यक्ष दत्ता भाऊ धोत्रे, नादिम मोमीन तसेच शहरातील महिला भागिनी उपस्थीत होत्या.








