चिंचवन येथील एसबीआय बँक कर्ज वाटपास टाळाटाळ

चिंचवन येथील एसबीआय बँक कर्ज वाटपास टाळाटाळ
तात्काळ कर्ज वाटप न झाल्यास, शेतकरी कामगार पक्ष्याच्या वतीने तहसील कार्यालय समोर २८/९/२०२० रोजी धरणे आंदोलनाचा इशारा
दत्ता करडे
वडवणी( बीड)
चिंचवन येथील भारतीय स्टेट बँक गेल्या पाच महिन्यापासून पीक कर्ज अर्ज देऊनही ठेवीस धरण्यात येत आहे. या बाबत बँक अधिकारी व कर्मचारी त्यांना समक्ष भेटून विनंती केली
मात्र भारतीय स्टेट बँकेचे अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांना दुय्यम वागणूक देऊन पीक कर्ज वाटपास टाळाटाळ करताहेत. तरी बँक कर्मचारी व अधिकारी यांनी पिक कर्ज वाटने तात्काळ सुरू करावे अन्यथा २८/९/२०२० रोजी तहसील कार्यालय समोर धरणे आंदोलन करणार असल्याचे शेतकरी कामगार पक्ष्याचे कार्यकर्ते श्री रामदास आंधळे,राजू शेख,विनोद आंधळे,बाळासाहेब आंधळे , अनिल कदम यांच्या सह.. शेतकरी कामगार पक्ष्याच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे.








