कन्कालेश्वर मंदिराच्या कुंडात आढळला एकाचा मृतदेह
Beed

कन्कालेश्वर मंदिराच्या कुंडात आढळला एकाचा मृतदेह
बीड/प्रतिनिधी
मयत बाळासाहेब विनायकराव ढेरे वय 40 राहणार धांडे गल्ली बीड हे आज साडेआठच्या सुमारास मृत अवस्थेत कंकालेश्वर मंदिराच्या पाण्यात आढळून आले होते या घटनेची माहिती कळताच पोलीस उप निरीक्षक गालिब पठाण, सह पोलीस हेडकॉन्स्टेबल खाडे, पोलीस नाईक अन्सार मोमीन, सचिन क्षीरसागर, सिराज पठाण, यांनी घटनास्थळी धाव घेत पाच तासात ओळख पटवली असून आत्महत्या की अपघात अजून समजू शकले नाही मयत हे मसोबा फाटा येथील डी फार्मसी कॉलेजवर टेक्निशन म्हणून कार्यरत होते.व यांच्या पश्चात दोन मुले असल्याची माहिती मिळाली आहे.








