वडवणी शहरातील एसबीआय बँक बंद असल्याने नागरिकांची अडचण!

Beed

वडवणी शहरातील एसबीआय बँक बंद असल्याने नागरिकांची अडचण !

वडवणी/प्रमिला माळी

वडवणी शहरातील एस.बी.आय बँक बंद असल्यामुळे नागरिकांची व शेतकरी बांधवांची खूप अडचण निर्माण झाली असून याठिकाणी लोकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.कोरोना च्या या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आपली चांगलीच भूमिका पार पाडली आहे परंतु याठिकाणी प्रशासनाने लोकांसाठी काहीतरी सुविधा करून द्यावी जेणेकरून बँक कामकाज चालू राहील अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.गेल्या काही दिवसांपूर्वी बँकेत कर्मचारी पॉझिटिव निघाल्याने बँक काही दिवसांपासून बंद असल्याचे कारण या ठिकाणी सुत्रांनी सांगितले आहे परंतु पॉझिटिव्ह आल्याने बँकेचे  व्यवहारासाठी व लोकांची अडचण निर्माण होऊ नये म्हणून याकडे प्रशासनाने काहीतरी दखल घ्यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

Sharing

Visitor Counter