एकल महिला संघटनेच्या वतीने धान्य वाटप

एकल महिला संघटनेच्या वतीने धान्य वाटप
बीड/प्रतिनिधी
एकल महिला संघटना ही महिलांनी महिलांसाठी चालवलेली संघटना आहे.
म्हणून च एकल संघटना संघटना झाली खास! एक एक महिलेचा घेऊन हातात हात !! एकल संघटनाच्या आमच्या एका लीडरची आठवण याक्षणी होते. कारण हे गीत आम्हाला या जगातून सोडून गेलेल्या मैत्रिणी चे आहे. कोरोनाच्या या संकटात सापडलेल्या आपल्याच भगिनीना संघटना च्या महिला मदतीला धावून येत आहेत. तर एकमेकांना आधार शब्दाचा, देत आहेत. एकमेकींच्या सोबत आहोत ही भावना दिसून येते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एप्रिल व मे मध्ये कुमशी, मैंदा, पिंपळवाडी, काकडहीरा, या गावातील महिला मंडळाच्या लीडर यांनी शहरातील महिलांच्या भूक भागवण्यासाठी भाकरी पुरवल्या. आम्ही घेणारे नाही तरआम्हीही काही देऊ शकतो ही भावना महिलांच्या बोलण्यातून समजली. आज बीड येथील धानोरा रोड, भागात एकल महिला संघटना च्या सभासद यांना ग्रामीण भागातील महिलाकडून 60 किलो तांदूळ धान्याची मदत झाली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने मानसी मोफत 5 किलो धान्य सर्वांना मोफत देण्याचे सांगितले होते. विधवा, परिक्तकता, अत्यंत गरजू कुटूंबाला
मोफत धान्य मिळाले नाही. शहरातील विविध भागात विधवा, परिक्तकता, घटस्फोटीत महिला, निराधार, घरकाम करणाऱ्या महिला, अपंग, अशा महिलांना ना रेशन कार्ड आहे, ना रेशन मिळत आहे? ना घरकुल आहेत, ना निराधार पेन्शन योजना चा लाभ मिळत आहे,आता तर हाताची कामे देखील सुटली आहेत, कुटुंब कसे चालवावे ही समस्या समोर आहे. शहरी भागातील महिलांच्या साठी शासनाने छोटी मोठी कामे उपलब्ध करून द्यावी. तसेच एकल महिला संघटना च्या महिलांना कोरो एकल महिला संघटना च्या वतीने काही प्रमाणात मदत करण्यात आली. परंतु सर्व महिलांच्या गरजा पूर्ण करणे शक्य नाही. म्हणून बीड तालुक्यातील उमरद खा., नेकनूर, बहिरवाडी, कुमशी, मानेवाडा, पाटोदा, दत्त नगर,गावातील महिला मंडळाच्या महिलांनी गावातच धान्य जमा केले व आपल्याच गावातील, शहरातील गरजू महिलांना वाटप केले. अशाच प्रकारे कुमशी येथील एकल महिला संघटना च्या समृद्धी महिला मंडळाने धान्य जमा करून बीड शहरातील आपल्या भगिनींना 60 किलो तांदूळ धान्य वाटप् केलं.या वेळी एका एकल महिलेच्या 10 वी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यास पुस्तके दिले. यावेळी एकल महिला संघटना च्या शिक्षण समितीच्या अध्यक्ष शिल्पा पंडित, सदस्य सरस्वती कळसकर, रमिता रोंगे, अयोध्या घोरपडे, रंजना वाघमारे, विद्या मस्के, साधना नागापूरे, रेखा ढवळे, ज्योती चांदजकर, प्रतिभा निकाळजे, पूजा चक्रे, शिल्पा जोगदंड, शोभा डावकर संगिता लोळगे, सचिव रुक्मिणी नागापूरे आदी महिला उपस्थित होत्या.








