कोरोना युध्दातील बीड पोलीस दलाचा शहीद योध्दा राजेंद्र साहेबराव वाघमारे यांना श्रद्धांजली

कोरोना युध्दातील बीड पोलीस दलाचा शहीद योध्दा राजेंद्र साहेबराव वाघमारे यांना श्रद्धांजली
बीड/प्रतिनिधी
दि . 29-09-2020 रोजी बीड पोलीस दलातील पोलीस हवालदार / 632 राजेंद्र साहेबराव वाघमारे वय 53 वर्ष रा . वाघेरा ता.पाटोदा जि.बीड नेमणूक युसुफवडगांव पोलीस ठाणे हे कोरोना विषाणू विरुध्दच्या युध्दात लढतांना त्यांना कोरोना या विषाणूजन्य आजाराची लागण झाल्याने उपचारा दरम्यान विरमरण आले . 12 डिसेंबर 1996 पोलीस दलात रुजु झाले . त्यांनी पोलीस प्रशिक्षण विद्यालय अकोला येथे पोलीस दलाचे मुलभूत प्रशिक्षण पूर्ण करून ते बीड जिल्ह्यातील जनतेच्या सेवेसाठी कर्तव्यावर रूजू झाले . त्यानंतर त्यांनी 1997 ते 2001 तीन वर्ष पोलीस मुख्यालय बीड येथे कर्तव्य बजावले . पुढे 2001 ते 2004 साली नेकनूर या पोलीस ठाणे येथे कर्तव्य बजावले.सन 2004 ते 2011 माजलगाव व 2011 ते 2016 धारूर , तसेच सन 2016 ते 2020 युसुफवडगाव असे एकूण 24 वर्षे त्यांनी पोलीस खात्यात उत्कृष्ट , प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष सेवा बजावली आहे . तसेच त्यांना सेवेत उत्कृष्ट कामगिरीबद्दल 13 रिवॉर्ड आतापर्यंत देण्यात आले आहेत . युसुफवडगाव येथे नेमणूकीस असतांना काल दि.28-09-2020 रोजी अॅन्टीजन टेस्ट कोरोना पॉझीटिव्ह आल्याने कालच त्यांना कोव्हिड सेंटर अंबाजोगाई येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते . आज दि.29-09-2020 रोजी दुपारी 03:00 वा.उपचारादरम्यान त्यांचे कोरोना या आजारामुळे दु : खद निधन झाले . अशा या बीड पोलीस दलाच्या शहीद कोरोना योध्यास संपुर्ण बीड पोलीस परिवाराकडून भावपुर्ण श्रध्दांजली .








