“मौजे घोसापुरी येथिल बेकायदेशिररित्या गायरान जमिन कैलाश गडाच्या नावाने बळकावण्याचा प्रयत्न "

“मौजे घोसापुरी येथिल बेकायदेशिररित्या गायरान जमिन कैलाश गडाच्या नावाने बळकावण्याचा प्रयत्न "
बीड/प्रतिनिधी
मौजे घोसापूरी ता.जि.बीड येथील गट क्र .92 मधील गायरान जमिन जे की , पडीक होती खडकाळ होती , ती जमीन गावातील भुमिहीन गरिब लोकांनी मशागतीसाठी तयार करुन त्यामध्ये ते पिक घेत आहेत . तसेच सदर गायरान जमिन गट क्र .92 मध्ये राहण्यासाठी शेड मारले आहे ते तेथे राहत आहेत . परंतु गावातील काही लोक जातीय भावनेतुन त्यांना त्रास देण्याच्या हेतुने विनाकारण जाणुनबुजून मा.बीड येथील न्यायालयामध्ये सदर जमिनीबाबत दिवाणी दावा क्र 154 / 2017 हे प्रकरण दाखल असतांना व त्यानंतर मा.न्यायालयाने “ जैसे थे ” परिस्थितीचा हुकूम दिलेला असतांना . संबंधीत गावकरी हे ग्रामसेवकाला हाताशी धरुन बेकायदेशीररित्या कैलाश गडाच्या नावाने PTR तयार केला आहे . तसेच गावातील काही लोक गुंड आहेत त्यांनी सदर गरिब लोकांनी शेड मारलेल्या जागेमध्ये विनाकारण बेकायदेशीर रित्या दि .26 / 09 / 2020 श्रीक्षेत्र भक्तिनिवास पाटी लावुन बेकायदेशीररित्या ताबा करण्याचा प्रयत्न करत आहेत . व गायरानधारकांना गायरानातुन बेदखल करण्याच्या मनस्थितीत आहेत व सदर जागा बळकावण्याच्या तयारीत आहेत . मा.न्यायालयात प्रकरण प्रलंबित असतांना सुध्दा बेकायदेशीरपणे अतिक्रमण करत आहेत व गरिब गायरानधारकांना हक्कापासून वंचित करत आहेत . त्यामुळे सदर गायरान धारकांना गावातील काही गावगुंडांपासुन जिवीतास धोका आहे , गायरानधारक हे सर्व अनुसूचित जातीचे सदस्य असल्यामुळे त्रास देत आहेत व बेकायदेशीररित्या जमिनीवर ताबा करण्याचा प्रयत्न करुन समाजात तेढ निर्माण करत आहेत . याबाबत पोलिस अधिक्षक बीड यांच्याकडे रितसर तक्रार केलेली आहे .








