हाथरस मधील दलित तरुणीवर झालेल्या अमानुष अत्याचाराबाबत तहसिलदार यांना गेवराई वंचित बहुजन आघाडी चे नीवेदन

हाथरस मधील दलित तरुणीवर झालेल्या अमानुष अत्याचाराबाबत तहसिलदार यांना गेवराई वंचित बहुजन आघाडी चे नीवेदन
प्रतीनीधी/गेवराई
उत्तर प्रदेशातील हाथरस येथील 19 वर्षीय दलित तरूणीवर झालेल्या अत्याचाराविरोधात तहसिलदार यांना वंचित बहुजन अाघाडी च्या वतीने निवेदन सादर करण्यात अाले. सदरिल हाथरस प्रकरणातील अारोपींना कठोरात्मक शिक्षा करण्यात यावी अशा मागण्या घेऊन निवेदन देण्यात अाले. यावेळी निवेदन सादर करताना तालूकाध्यक्ष सय्यद सुभानभाई,जिल्हाउपाध्यक्ष सुदेश पोतदार, युवक तालुकाध्यक्ष बंटी सौंदरमल, महासचिव किशोर भोले, रंजित शिंदे, सम्यक तालूकाध्यक्ष प्रदिप शिंदे, तालूका प्रवक्ते प्रमोद निकाळजे, महिला प्रतिनिधी रमा लोखंडे, किरण कांबळे, गुलाब सुर्यवंशी, सनी सुर्यवंशी,महेश कांबळे अाबासाहेब तोतरे,किशोर काकडे अादिंची उपस्थिती होती.








