बांगडी आंदोलन राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने युपी सरकार आणि केंद्रसरकारचा जाहीर निषेध

बांगडी आंदोलन राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने युपी सरकार आणि केंद्रसरकारचा जाहीर निषेध
पंढरपूर/वार्ताहर
उत्तर प्रदेशातील हाथरस आणि बलरामपूर येथील तरुणीवरील सामूहिक बलात्कार करून तिच्यावर घृणास्पद अत्याचार करण्यात आला. काल या पीडित तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना समजली. ही घटना अत्यंत क्लेशदायक, संतापजनक व लाजिरवाणी आहे, म्हणून आज राष्ट्रवादी युवती काँग्रेस, सोलापूर च्या वतीने व प्रदेशअध्यक्षा साक्षणा सलगर ताई यांच्या सूचनेनुसार मा. केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांना बांगड्या व डोळ्याला काळी पट्टी असलेले पोस्टरला बांगड्यांचे हार घालून आंदोलन करून निषेध करण्यात आला. तसेच बांगड्या पोस्टाने भेट देण्यात आल्या त्यावेळी श्रीया भोसले(जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवती काँग्रेस),सौ.किर्ती मोरे(पंढरपूरयुवती पंढरपूर तालुका अध्यक्ष),चारुशीला कुलकर्णी(प्रदेश संघटक),डॉ.अमृता मेनकुदळे(पंढरपूर शहर अध्यक्ष),सुधीर आबा भोसले( पंढरपूर शहर अध्यक्ष),सौ.साधना राऊत(ओ.बी.सी. महिला जिल्हाअध्यक्ष),सौ.अनिता पवार(पंढरपूर महिला तालुका अध्यक्ष),सौ.संगीता माने(पंढरपूर शहर अध्यक्ष), सचिन कदम(पंढरपूर शहर उपाध्यक्ष), कपिल कदम ( पंढरपूर शहर सहसचिव),शुभम साळुंखे(उपाध्यक्ष,राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेस),ओंकार जगताप(उपाध्यक्ष ,राष्ट्रवादीविद्यार्थी काँग्रेस )सौ.सारिका गायकवाड, कु.हर्षाली परचंडराव,कु.गायत्री सावंत,कु.राधा मलपे,कु.योगिता मस्के, कु.शीतल शिरगिरे,कु.भक्ती शिंगटे, कु.ऐश्वर्या शिंगटे, आदी उपस्थित होते.








